जिओचे सब्सक्राइबर्स आकडेवारी ५० कोटी पर्यंत पोहोचण्यासाठी जिओने प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टसमध्ये झालेल्या वार्षिक सभेत कंपनीने हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. ५० कोटी आकडेवारी गाठण्यासाठी जिओन स्वस्तातील ४ जी स्मार्टफोन आणणार आहे. सध्या दुसऱ्या कंपन्यांच्या नेटवर्कवर ५० कोटीहून अधिक २ जी युजर्स आहेत. त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी जिओने टार्गेट ठेवले आहे. जिओची सध्या सब्सक्राइबर्सची संख्या जवळपास ३७.५ कोटी आहे. भारतात सध्या 4G LTE स्मार्टफोन्सची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे २ जी युजर्स ४ जी वर अपग्रेड करू शकत नाही. २ जी युजर्सला ४ जी वर शिफ्ट करण्यासाठी २ हजार ते ३ हजार रुपये दरम्यान ४ जी स्मार्टफोन्सची गरज लागणार आहे.
३ हजार रुपयांचा ४ जी स्मार्टफोन हा स्वस्त स्मार्टफोन वाटत असला तरी त्यात किती सुविधा मिळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बाजारात सध्या स्वस्तातील स्मार्टफोन मिळतात. परंतु, त्या कंपन्यांवर विश्वास ठेवता येत नाही. परंतु, जिओ भारतातील एक टॉप कंपन्यांपैकी एक आहे. त्यामुळे जिओचा स्वस्तातील 4G LTE स्मार्टफोन्स चांगला असण्याची शक्यता आहे. भारतात मोबाइल युजर्सची संख्या जवळपास १०० कोटी आहे. यात ५५ कोटी युजर्स २जी किंवा ३जी नेटवर्कमधील आहेत. जिओ युजर्सला आधीपासूनच ४ जी सेवा देते. कंपनीने २०१७ मध्ये पहिल्यांदा युजर्संना केवळ दीड हजार रुपये किंमतीचा ४ जी फीचर स्मार्टफोन लाँच केला होता. जिओचा हा फोन अनेकांच्या पसंतीस पडला होता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times