MevoFit ड्राइव्ह फिटनेस बँड

MevoFit Drive Fitness Band च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ओलेड टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे. या फिटनेस बँडमध्ये स्टेप्स, डिट्टेंस, रनिंग, कॅलरी बर्न, अॅक्टिव्ह मिनिट ट्रॅकिंग, ऑटोमॅटिक स्लीप ट्रॅकर, सेडेंटरी अलर्ट, कॅमेरा क्लिक शॉर्टकट आणि रिमाइंडर फीचर दिले आहे. या वॉटरप्रूफ फिटनेस बँडमध्ये कॉल, एसएमएस आणि सोशल मीडिया नॉटिफिकेशन देखील मिळेल. या डिव्हाइसची किंमत ३,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त ९९९ रुपयात खरेदी करू शकता.
AmazonBasics 2.4A/12W प्रति-पोर्ट ड्युअल USB कार चार्जर

फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर AmazonBasics च्या या कार चार्जरमध्ये ड्यूल यूएसबीसह २ पोर्ट दिले आहे. याद्वारे तुम्ही सहज अँड्राइड स्मार्टफोन आणि आयफोन दोन्हीला चार्ज करू शकता. सुरक्षेबद्दल सांगायचे तर या डिव्हासमध्ये सेफ्टी ओव्हरलोड, शॉर्ट सर्किट आणि ओव्हर वोल्टेज सेफ्टी बिल्ट-इन मिळते. याद्वारे तुम्ही सहज कारमध्ये स्मार्टफोन चार्ज करू शकता. ऑफरबद्दल सांगायचे तर AmazonBasics च्या या कार चार्जरची किंमत १,३०० रुपये आहे. मात्र सेलमध्ये तुम्ही फक्त ३६९ रुपयात खरेदी करू शकता.
टीपी-लिंक TL-WR841N 300Mbps वायरलेस एन केबल

हा वायरलेस राउटर ३०० एमबीपीएस वायरलेस स्पीड प्रदान करतो. याद्वारे तुम्ही एचडी व्हिडिओ स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकता. याशिवाय घरातील सर्व डिव्हाइसशी या राउटरला कनेक्ट करू शकता. राउटरची मूळ किंमत १,६९९ रुपये आहे, मात्र सेलमध्ये फक्त ९२९ रुपयात खरेदी करू शकता.
लेनोवो वायर्ड कीबोर्ड आणि माउस कॉम्बो KM4802
या वायर्ड कीबोर्डला तुम्ही सहज लॅपटॉप आणि डेस्कटॉपशी कनेक्ट करू शकता. सेलमध्ये हा कीबोर्ड ९९९ रुपयात उपलब्ध आहे. याची मूळ किंमत १,७११ रुपये आहे.
केस प्लस टाइप सी ते 3.5 मिमी जॅक ऑडिओ कनेक्टर

Case Plus Type C to 3.5 mm Jack Audio Connector च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर हे डिव्हाइस तुमच्यासाठी खूपच कामाचे ठरू शकते. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये हेडफोन पोर्ट नसल्यास तुम्ही Case Plus Type C द्वारे ३.५ एमएम जॅक ऑडिओ कनेक्टर, नॉइज कॅन्सलिंग हेडफोन जॅक कन्वहर्टर ऑडिओ अडॅप्टरचा वापर करू शकता. या ऑडिओ कनेक्टरची मूळ किंमत १,९९९ रुपये आहे. मात्र सेलमध्ये फक्त २७५ रुपयात हे डिव्हाइस उपलब्ध आहे.
पोर्ट्रॉनिक्स POR 343 UFO 6 पोर्ट 8A होम चार्जिंग स्टेशन

या डिव्हाइसच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Portronics च्या होम चार्जिंग स्टेशनमध्ये ६ यूएसबी पोर्ट ८ए आउटपूट दिले आहे. याद्वारे तुम्ही स्मार्टफोन आणि टॅबलेट सहज चार्ज करू शकता. या डिव्हाइसमध्ये इन बिल्ट स्मार्ट आयसी दिली असून, याद्वारे हे डिव्हाइस तपासून फास्ट चार्जिंग प्रदान करेल. सोबतच, ओव्हर-वोल्टेज, ओव्हर-करंट, शॉर्ट सर्किटची समस्या देखील निर्माण होणार होणार आहे. Portronics Home Charging Station ची मूळ किंमत १,२९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये तुम्ही ७९९ रुपयात खरेदी करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times