OPPO A31

OPPO A31 ची किंमत १५,९९९ रुपये असून, सेलमध्ये ११,४९० रुपयात खरेदी करू शकता. तसेच, १०,७५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्स आणि अॅक्सिस बँक व सिटी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये रियरला १२+२+२ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ६.५ इंच डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. ड्यूल सिम सपोर्टसह येणाऱ्या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक ६७६५ ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. पॉवरसाठी ४२३० एमएएचची बॅटरी दिली आहे.
रेडमी नोट 10 लाइट

Redmi Note 10 Liteस्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये, सेलमध्ये १३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय १२,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ घेता येईल. फोनमध्ये २.३GHz Qualcomm Snapdragon ७२०G ८nm ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये रियरला ४८ + ८ + २ + २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ६.६७ इंच FHD डिस्प्ले दिला आहे. पॉवरसाठी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०२० एमएएचची बॅटरी मिळते. यात ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल.
iQOO Z3 5G

iQOO च्या या स्मार्टफोनची किंमत २४,९९० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये फक्त १८,९९९ रुपयात उपलब्ध आहे. फोनवर १४,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्स आणि अॅक्सिस बँक व सिटी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon ७६८G 5G प्रोसेसर दिला आहे. पॉवरसाठी ५५ वॉट फ्लॅशचार्ज सपोर्टसह ४४०० एमएएचची बॅटरी मिळते. यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
सॅमसंग गॅलेक्सी एम 52 5 जी

Samsung Galaxy M52 5G ची मूळ किंमत ३४,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त २५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, फोनवर १४,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्स आणि अॅक्सिस बँक व सिटी बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट देखील मिळेल. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड आणि ५ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात ६.७ इंच सुपर AMOLED प्लस- इन्फिनिटी O डिस्प्ले, Qualcomm SDM ७७८G ऑक्टा कोर प्रोसेसर, ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल.
आयफोन 11

iPhone 11 च्या ६४ जीबी मॉडेलची किंमत ४९,९०० रुपये आहे. मात्र, डिस्काउंटनंतर ४१,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ग्राहकांना १४,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्स मिळेल. एक्सचेंज ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोन २७,९४९ रुपयात तुमचा होईल. तसेच, तुम्ही ठराविक क्रेडिट/डेबिट कार्डचा वापर करून iPhone 11 ला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. लक्षात घ्या की, १४,०५० रुपये एक्सचेंज ऑफर ही फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times