नवी दिल्लीः दिल्लीत करोना व्हायरसची धडक बसल्यानंतर चीनच्या दोन कंपन्यांनी आपला नियोजित कार्यक्रम रद्द केला आहे. आणि शाओमीने नवी दिल्लीतील फोनची नियोजित लाँचिंग रद्द केली आहे. रियलमीची 6 सीरिज लाँच होणार होती. परंतु, कंपनीने आता ही लाँचिंग ऑनलाइन होणार असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर शाओमीचा १२ मार्च रोजी Redmi Note 9 सीरीजची लाँचिंग रद्द करण्यात आली आहे.

रियलमी इंडियाचे सीईओ आणि शाओमीचे व्यवस्थापकिय संचालक या दोघांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, या कार्यक्रमासाठी ज्या-ज्या व्यक्तीकडून या कार्यक्रमासाठी पैसे घेण्यात आले होते. त्या-त्या व्यक्तींना एक-एक रियलमी बँड दिला जाईल. तसेच याची माहिती ई-मेलवरून सांगण्यात येईल. रियलमीचे दोन नवीन स्मार्टफोन Realme 6 आणि Realme 6 Pro पाच मार्च रोजी भारतात लाँच करण्यात येणार होते. रियलमी ६ सीरिजसाठी रियलमीने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आपला ब्रँड अॅम्बेसिडर बनवले आहे. , रेडमीची नवी सीरिज १२ मार्च रोजी भारतात लाँच करण्यात येणार होती. या सीरिजमध्ये Redmi Note 9 आणि Redmi Note 9 Pro हे दोन फोन लाँच करण्यात येणार होते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here