नवी दिल्लीः २५ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच झालेल्या स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा सेल कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. या सेलमध्ये आयक्यू ३ खरेदीवर काही ऑफर्स आणि डिस्काउंट दिला जाणार आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे.

आयक्यूने या फोनला ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज, ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज (५ जी कनेक्टिविटी) सह बाजारात लाँच केले होते. कंपनीने ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३६ हजार ९९० रुपये ठेवली आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३९ हजार ९९० रुपये तर तिसऱ्या फोनची किंमत ४४ हजार ९९० रुपये ठेवली आहे. ग्राहकांना हा फओन क्वांटम सिल्वर, वॉलकेनो ऑरेंज आणि टॉरनेडा ब्लॅक या रंगात उपलब्ध करण्यात आले आहेत. या फोनवर युजर्संना १ हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच कंपनीच्या ग्राहकांना १७ हजार ५० रुपयांचा एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. iQOO 3 च्या पहिला सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट कार्ड युजर्संना ३ हजारांपर्यंत तत्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड युजर्संना ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. तसेच लाँच ऑफरमध्ये हा फोन खरेदी करणाऱ्या जिओ युजर्संना १२ हजारांपर्यंत फायदे मिळणार आहेत. जिओच्या ३४९ रुपयांच्या प्लानवर ही ऑफर आहे.

आयक्यूने या फोनमध्ये ६.४४ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. या फोनमध्ये ८६५ स्नॅपड्रॅगन चिपसेट सपोर्ट दिला आहे. फोन iQOO UI 1.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. कंपनीने या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १३ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. तसेच युजर्ससाठी फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ४४४० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. iQoo ने नुकतेच ऑनलाइन मार्केटमधून आपला स्मार्टफोन विक्री करण्याचे ठरवले आहे. भारतात या फोनची विक्री करण्यासाठी कंपनीने फ्लिपकार्टसोबत आपल्या कराराची घोषणा केली आहे. तसेच कंपनीची अधिकृत साइट यावरूनही या फोनची विक्री करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात विवोचा सब ब्रँड आयकोने भारतात आपली सुरूवात केली होती. तसेच स्वतंत्रपणे स्मार्टफोन लाँच केला होता. भारतात या फोनची टक्कर वनप्लस, हुवेई आणि शाओमीशी होईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here