ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सुरू असलेल्या Great Indian Festival सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. या सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोनपासून ते स्मार्टवॉचपर्यंत अनेक प्रोडक्ट्स खरेदी करू शकता. इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील सेलमध्ये स्वस्त प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर रेडमीचे फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये रेडमी १० सीरिजवर बंपर ऑफर मिळत आहे. हे स्मार्टफोन्स ५० मेगापिक्सल कॅमेरा, ५जी सपोर्ट, दमदार प्रोसेसर आणि पॉवरफुल बॅटरीसह येतात. यामध्ये बिल्ट-इन अ‍ॅलेक्सा सपोर्ट देखील मिळतो. रेडमीच्या सर्व फोन्सवर एक्सचेंज बोनस देखील दिला जात आहे. याशिवाय ग्राहकांना एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. सिटी अथवा अ‍ॅक्सेस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. ग्राहकांना ६ महिने मोफत स्क्रीन रिप्लेसमेंटची देखील सुविधा मिळते.

रेडमी 10 प्राइम

redmi-10-prime

Redmi 10 Prime स्मार्टफोनची मूळ किंमत १६,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये १४,४९९ रुपयात खरेदी करू शकता. सिटी अथवा अ‍ॅक्सेस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट दिले जात आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, याशिवाय ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो आणि २ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा दिला आहे. हा फोन मीडियाटेक जी८८ ऑक्टा-कोर प्रोसेसर, ६००० एमएएच बॅटरी, ६.५ इंच FHD डिस्प्ले आणि ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेजसह येतो.

रेडमी नोट 10 एस

redmi-note-10s

Redmi Note 10S स्मार्टफोनची किंमत १८,९९९ रुपये असून, सेलमध्ये फक्त १५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सिटी अथवा अ‍ॅक्सेस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. फोनमध्ये ६.४३ इंच FHD इंच डिस्प्ले, रियरला ६४ + ८ + २ मेगापिक्सल आणि सेल्फीसाठी १३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यात MediaTek Helio G95 Octa-core प्रोसेसर, ५००० एमएएचची दमदार बॅटरी आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोरेज मिळते.

रेडमी नोट 10 लाइट

redmi-note-10-lite

१६,९९९ रुपये किंमतीचा हा फोन सेलमध्ये १३,९९९ रुपयात मिळत आहे. फोनवर १२,३५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा लाभ मिळेल. यात २.३GHz Qualcomm Snapdragon ७२९G ८nm ऑक्टा कोर प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. यात रियरला ४८ + ८ + २+ २ मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन ६.६७ इंच FHD डिस्प्लेसह येतो. यात पॉवरसाठी ५०२० एमएएच लिथियम पॉलिमर बॅटरी दिली आहे.

रेडमी नोट 10 टी 5 जी

redmi-note-10t-5g

Redmi Note 10T स्मार्टफोनची किंमत १८,९९९ रुपये आहे. परंतु, अ‍ॅमेझॉन सेलमध्ये १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन खरेदी करताना सिटी अथवा अ‍ॅक्सेस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. याशिवाय २ + २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळते. यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ऑक्टा-कोर प्रोसेसर मिळतो. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. तसेच ६.५ इंच FHD डिस्प्ले आणि इन-बिल्ट अ‍ॅलेक्सा सपोर्ट दिला आहे.

रेडमी नोट 10 प्रो

redmi-note-10-pro

Redmi Note 10 Pro स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये १७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सिटी अथवा अ‍ॅक्सेस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास फोनवर १,२५० रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. यात रियरला ६४ + ८ + ५ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. यात क्रायो ४७९ ऑक्टा-कोरसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३२G प्रोसेसर, ५०२० एमएएच बॅटरी, ६.६७ इंच FHD डिस्प्ले दिला आहे. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here