विंड टनलचा इतिहास
या विंड टनलचे निर्माण १९५० साली झाले होते. त्यानंतर १९५९ साली म्हैसूरचे राजा जय चामराजेंद्र वाडियार यांनी या टनलचे उद्धाटन केले होते. या टनलमध्ये कुलिंग टॉवर आहेत. तसेच टनलमध्ये विमान, जहाज आणि अंतरिक्ष लाँचिंग गाडीची चाचणी केली जाते. चाचणी पूर्ण झाल्यानंतर मॉडेलच्या कमतरता शोधून त्या दुरुस्त करता येतात. याआधी इस्रोने चाचणीसाठी लाकडाने बनवलेल्या मॉड़ेलचा वापर केला जात असत.
अवघ्या १.४ लाखात टनल तयार
या विंडो टनलला बनवण्यासाठी केवळ १.४ लाख रुपये खर्च आला होता. हे विंड टनल २० फुट रूंद आणि ८० फुट लांबीचे आहे. याचे आणखी एक १६ मीटरचे दोन पंखे आहेत. जे १६० प्रतितास वेगाने हवा फेकते. या टनलमध्ये हवेच्या दबावामुळे मॉडेलची चाचणी केली जाते. तसेच मॉडेल मजबुत आहे की नाही, हे तपासले जाते.
चार वायुसेनेचे पायलट सज्ज
देशाचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट गगनयानसाठी वायुसेनेच्या चार पायलटना रशियात प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. हे प्रशिक्षण एका वर्षाचे असणार आहे. गागरिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये हे मिशन तयार केले जात आहे. या सेंटरमध्ये भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा आणि त्यांचे सहकारी रवीश मल्होत्रा यांना प्रशिक्षण दिले जाईल. चार पायलटमध्ये जैव चिकित्सा, शारिरीक अभ्यास, सोयूज मानव अंतरिक्ष यानची मॉडेलच्या माहितीचा अभ्यास करतील.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times