गूगल I/O Event 2020 रद्द
करोना व्हायरसच्या भीतीमुळे गुगलने हा कार्यक्रम रद्द केला आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. हा कार्यक्रम रद्द करावा लागल्याने आम्हाला निश्चित दुःख झाले आहे, असेही गुगलने म्हटले आहे.
GDC 2020 कार्यक्रमही रद्द
जीडीसी २०२० इव्हेंट करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला होता. या कार्यक्रमात जगभरातील दिग्गज गेमिंग कंपन्या सहभागी होणार होती. तसेच अनेक नवीन गेम ग्लोबल लेवलवर लाँच करण्यात येणार होते. व्हायरसला रोखण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करावा लागल्याचे आयोजकांनी सांगितले.
Facebook F8 Conference रद्द
करोना व्हायरसचा सर्वात मोठा झटका टेक्नोलॉजी शो मोबाइल वर्ल्ड काँग्रेस २०२० बसला आहे. यानंतर टेक्नोलॉजीतील एक-एक कार्यक्रम रद्द करावे लागत आहेत. फेसबुकचा वार्षिक कार्यक्रम काँफ्रेन्स एफ८ रद्द करावा लागला. मागच्या वर्षी झालेल्या या कार्यक्रमात ५ हजार लोक सहभागी झाले होते. ५ व ६ मे रोजी कॅलिफॉर्नियात हा कार्यक्रम पार पडला होता.
मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2020 रद्द
सर्वात आधी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला होता. बार्सिलोनात करोना पसरवू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे आयोजकांनी सांगितले.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times