नवी दिल्लीः चीनमधील करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात भीती पसरली आहे. जगभरात चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला खूप मागणी आहे. परंतु, करोना व्हायरसमुळे या वस्तू आता ३० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद करण्यात आली आहे. परंतु, बाजारात आधीच असलेले इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची विक्री होत आहे. परंतु, हे पॅकिंग उघडताना काळजी घेतली जात आहे. हातात हातमोजेचा वापर कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.

चीनमधून येत असलेल्या सामानांची तपासणी करताना किंवा इलेक्ट्रॉनिक उत्पादने उघडताना काळजी घेणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांनी यासंबंधी काळजी घ्यायला सांगितली आहे. हातमोजेचा वापर करणे हे सर्वांसाठी चांगले आहे, असे ऑल दिल्ली कम्प्यूटर ट्रेडर्स असोसिएशन, नेहरू, प्लेसचे अध्यक्ष महेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. तसेच एम्सच्या डॉक्टरांनीही सावधनता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

टीव्ही, मोबाइलसह महाग

इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दर आणखी वाढणार आहेत. भारतीय बाजारात आता चीनहून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात बंद होत आहे. फेब्रुवारीत कोणत्याही प्रकारचा माल पोहोचला नाही. त्यामुळे या वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सरकारी कार्यालयात क्लोजिक होत असते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे. चीनमधून दोन-तीन महिन्यापूर्वी जे सामान आले आहे. ते सामान उघडताना हातमोजेचा वापर करावा. जर एखाद्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक सामान दाखवायचे असेल, तर अशावेळी काळजी घेणे गरजेचे आहे. चीनमध्ये सामानांची पॅकिंग करोना व्हायरस रुग्णांनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here