भारतात फेस्टिव्ह सीजनला सुरुवात झाली असून सध्या सर्वत्र सणासुदीचा उत्साह पाहायला मिळत आहे, साहजिकच, प्रत्येकाने या हंगामासाठी तयारी केली असेल . या सीजनमध्ये लोकांना खूप खरेदी करायला आवडते. तुम्हालाही आवडत असेल. अनेकांच्या शॉपिंग बकेटमध्ये स्मार्टफोनही असतो. जर तुम्ही देखील यापैकी एक असाल आणि तुम्ही तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, ज्याची किंमत १०,००० रुपयांपेक्षा कमी आहे आणि चांगल्या फीचर्ससह सुसज्ज आहे, जर तुम्ही सारखे फोन शोधत असाल पण, या जेटमध्ये कोणता फोन घ्यावा आणि कोणता नाही हे तुम्हाला कळात नसेल तर येथे आम्ही तुम्हाला काही पर्यायांची माहिती देत आहोत. जे, १०,००० रुपयांपेक्षा कमीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये Realme, Samsung, Infinix, Motorola सारख्या नामांकित कंपन्यांच्या फोन्सचा समावेश आहे. जाणून घेऊया या पर्यायांबद्दल.

मोटोरोला G10 पॉवर

मोटोरोला-जी 10-पॉवर

हा फोन फक्त एका प्रकारात येतो. याला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह सादर करण्यात आले आहे. त्याची किंमत ९,९९९ रुपये आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर ४८ मेगापिक्सेलचा आहे. दुसरा ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आहे, तिसरा २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे आणि चौथा २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये ६००० mAh ची बॅटरी आहे जी २० W फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करते.

टेकनो स्पार्क 7

टेक्नो-स्पार्क -7

या फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे. त्याचबरोबर ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,४९९ रुपये आहे. यात ६.५२ इंच एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले आहे. हा फोन ६००० mAh बॅटरीसह येतो. फोनमध्ये १६ MP AI ड्युअल रिअर कॅमेरा आहे. तसेच ८ MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. यात ३ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. हे Android ११ सह येते.

Infinix Smart 5

infinix-smart-5

या फोनच्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,१९९ रुपये आहे. यात ६.८२ इंच HD+ डिस्प्ले आहे. यात ६००० mAh ची बॅटरी आहे. या फोनला MediaTek Helio G25 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला असून २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आहे. हे डिव्हाइस Android 10 वर काम करते. फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर १३ मेगापिक्सेलचा आहे. दुसरा डेप्थ सेन्सर आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एफ 12

सॅमसंग-गॅलेक्सी-एफ -12

फोनचे ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट ९,४९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याचबरोबर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,४९९ रुपये आहे. यात ६.५ इंच PLS TFT LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, या फोनला ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ४८ MP + ५ MP + २ MP + २ MP कॅमेरा आहे. ८ एमपीचा फ्रंट सेन्सर देखील आहे.

Realme Narzo 50i

realme-narzo-50i

या फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर, त्याच्या बेसिक व्हेरिएंट २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,४९९ रुपये आहे. यात ६.५ इंचांचा मोठा डिस्प्ले आहे. त्याचा स्क्रीन टू बॉडी रेशो ८८.७ टक्के आहे. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, या फोनला ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी पर्यंत रॅम आणि ६४ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ८ MP AI कॅमेरा आणि ५ MP चा फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here