हायलाइट्स:

  • OnePlus 9 Pro 5G सह इतर डिव्हाइसेसवर मोठा डिस्काउंट
  • स्वस्तात खरेदी करता येतील OnePlus चे प्रोडक्टस
  • OnePlus वेअरेबल्स खरेदी करा अतिशय कमी किमतीत

नवी दिल्ली : सध्याच्या या फेस्टिव्ह सीजनमध्ये अनेक महागडे हँडसेट बनवणाऱ्या कंपन्यांचे फ्लॅगशिप स्मार्टफोन खूप कमी किंमती किंवा उत्तम ऑफरसह उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला OnePlus 9 Pro, वनप्लस ब्रँडचा प्रीमियम फोनवर उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट ऑफर्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची मोठी बचत होईल. तसेच, तुम्हाला या OnePlus 9 Pro 5G सह कंपनीच्या वेअरेबल्स देखील कमी किंमतीत मिळतील. या फोनसह, वनप्लस बँड, वनप्लस बड्स आणि OnePlus Buds Z देखील मोठ्या सवलतीसह खरेदी करता येईल. पाहा डिटेल्स.

वाचा: boAt च्या स्मार्टवॉचवर जबरदस्त ऑफर, ७९९० रुपयाची वॉच खरेदी करा २४९९ रुपयात

OnePlus 9 Pro 5G वैशिष्ट्ये:

प्रदर्शन : या वनप्लस स्मार्टफोनमध्ये ६.७ -इंच QuadHD + (१४४०x३२१६ पिक्सेल) फ्लुइड २.० AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन LTPO तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे जो स्मार्ट १२० Hz वैशिष्ट्य सक्षम करतो.

प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज: ८ जीबी रॅम आणि १२ जीबी एलपीडीडीआर ५ रॅम आणि २५६ जीबी यूएफएस ३.१ स्टोरेजसह स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी. पण मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने यात स्टोरेज वाढवणे शक्य नाही.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये 5G, Wi-Fi 6, 4G LTE, GPS, A-GPS, Bluetooth version 5.2, USB Type-C पोर्ट आणि NFC सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला फोनमध्ये स्थान मिळाले आहे.

कॅमेरा: फोनच्या मागील पॅनलवर चार मागील कॅमेरे देण्यात आले आहेत, ४८ MP Sony IMX789 प्रायमरी कॅमेरा, ५० MP Sony IMX766 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, ८ मेगापिक्सेल टेलिफोटो कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

बॅटरी: फोनला अधिक पावरफुल बनविण्यासाठी ४५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65T वॉर्प चार्ज आणि ५० W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोन IP68 धूळ आणि पाणी प्रतिरोधनासाठी प्रमाणित आहे.

वन प्लस ऑफर

OnePlus 9 Pro 5G ची भारतात किंमत :

या OnePlus मोबाईल फोनचे ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज वेरिएंट ६४,९९९ रुपयांना विकले जात असून १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह पॅक केलेला व्हेरिएंट ६९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल.

OnePlus 9 Pro 5G ऑफर:

जुना फोन देताना ३,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनस, एसबीआय क्रेडिट कार्डवर ३००० रुपयांची त्वरित सूट उपलब्ध असेल. एसबीआय क्रेडिट कार्डवर ९ महिन्यांपर्यंत आणि बजाज फिनसर्व्ह कार्डवर ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयची सुविधा आहे.

भारतात OnePlus बँडच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, हा बँड २,४९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता, पण OnePlus 9Pro सह, तुम्ही हा बँड फक्त ४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.


किमतीत कपातीसह OnePlus Buds :

भारतातील वनप्लस बड्सच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ३,९९९ रुपये किंमतीचे हे मॉडेल OnePlus 9 Pro सह २,४९९ रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

वाचा: नोकरी सोबत Extra Income! या वेबसाइट्स देतात घर बसल्या पैसे कमविण्याची संधी, पाहा डिटेल्स

वाचा: ऑफर्स!’या’ तीन बजेट स्मार्टफोन्सवर मिळतेय शानदार ऑफर्स, जाणून घ्या डिटेल्स

वाचा: ‘या’ भन्नाट टिप्स वापरुन मिनिटांत वाढवा Laptop आणि Computer ची स्पीड, पाहा ट्रिक्स

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here