३ ऑक्टोबरपासून Amazon वर सुरू झालेला Great Indian Festival सेल अजूनही सुरूच असून, या सेलमध्ये ग्राहकांना वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर्सचा लाभ मिळत आहे. सेलमध्ये स्मार्टफोन्स, टीव्ही, वॉचसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही जर दिवाळीच्या निमित्ताने नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही उत्तम संधी आहे. सेलमध्ये रियलमीच्या फोन्सवर देखील खास ऑफर्स मिळत आहे. ६४ मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोन्सला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. Amazon Festival Sale मध्ये रियलमीच्या फोन्सवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट कॅशबॅक आणि १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये realme 8 5G, Realme GT 5G Master Edition, realme Narzo 30, Realme 5 Pro आणि realme narzo 50A स्मार्टफोनला स्वस्तात खरेदी करू शकता.

realme 8 5G

realme-8-5g

Realme 8 5G स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये आहे. या फोनला अ‍ॅक्सिस, सिटी, IndusInd Bank बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १,५०० रुपये इंस्टंट कॅशबॅक मिळेल. सोबतच, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर्स देखील दिली जात आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. यात ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल आहे. याशिवाय २+२ मेगापिक्सलचे कॅमेरे देखील मिळतात. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ५००० एमएएचची बॅटरी आणि MediaTek Dimensity ७०० (MT६८३३) प्रोसेसर दिला आहे.

Realme GT 5G मास्टर एडिशन

realme-gt-5g-master-edition

२९,९९९ रुपये किंमत असलेला Realme GT 5G Master Edition स्मार्टफोन सेलमध्ये २४,७०८ रुपयात मिळत आहे. या फोनला अ‍ॅक्सिस, सिटी, IndusInd Bank बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १,५०० रुपये इंस्टंट कॅशबॅक मिळेल. सोबतच, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर्स देखील दिली जात आहे. फोनमध्ये रियरला ६४+८+२ मेगापिक्सल आणि फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. यात ६.४३ इंच एचडी+ डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर आणि ४३०० एमएएचची बॅटरी मिळते.

realme Narzo 30

realme-narzo-30

रियलमीच्या या फोनची किंमत १६,९९९ रुपये आहे, मात्र सेलमध्ये १४,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनला अ‍ॅक्सिस, सिटी, IndusInd Bank बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १,५०० रुपये इंस्टंट कॅशबॅक मिळेल. सोबतच, १२,३५० रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर मिळते. फोनमध्ये ६ जीबी + १२८ जीबी स्टोरेज, ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले, रियरला ४८ + २ +२ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी९५ प्रोसेसर आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते.

Realme 5 Pro

खरोखर-5-प्रो

या फोनची किंमत १७,९९९ रुपये असून, सेलमध्ये १६,६३४ रुपयात खरेदी करू शकता. फोनला अ‍ॅक्सिस, सिटी, IndusInd Bank बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १,५०० रुपये इंस्टंट कॅशबॅक मिळेल. सोबतच, १५ हजार रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर मिळते. यामध्ये ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज, ६.४ इंच HD ड्यू-ड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले, फ्लॅश चार्जिंगसह ४०३५ एमएएच बॅटरी, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ AIE ऑक्टा कोर प्रोसेसर दिला आहे. यात रियरला ४८+८+२+२+२ मेगापिक्सल आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

realme narzo 50A

realme-narzo-50a

realme narzo 50A ची किंमत १३,९९९ रुपये असून, सेलमध्ये १२,४९९ रुपयात उपलब्ध आहे. या फोनला अ‍ॅक्सिस, सिटी, IndusInd Bank बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास १,५०० रुपये इंस्टंट कॅशबॅक मिळेल. तसेच, ११,६५० रुपयांपर्यंत एक्सजेंच ऑफर्स देखील दिली जात आहे. फोनमध्ये रियरला ५०+२+२ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ६.५ इंच एचडी डिस्प्ले, ६००० एमएएचची बॅटरी, मीडियाटेक हीलियो जी८५ ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज दिले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here