तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. या दिवाळीच्या निमित्ताने प्रमुख ई-कॉमर्स वेबसाइट्सने सेलचे आयोजन केले आहे. या सेलमध्ये तुम्हाला प्रीमियम स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करता येईल. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स व डील्सचा लाभ मिळेल. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही जर कोणाला स्मार्टफोन गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर ही वेळ फायद्याची ठरू शकते. शानदार डिस्प्ले, पॉवरफुल बॅटरी, प्रोसेसर, जास्त स्टोरेजसह येणारे अनेक फोन्स बाजारात उपलब्ध आहेत. सेलमध्ये तुम्ही Oppo F19s (Special Edition), OnePlus Nord 2 5G, Oppo Reno 6 Pro 5G, itel Vision 2S आणि Infinix Hot 11S या शानदार स्मार्टफोन्सला आकर्षक ऑफर्ससह खरेदी करू शकता. या टॉप-५ स्मार्टफोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Oppo F19s (विशेष संस्करण)

oppo-f19s-विशेष-आवृत्ती

Oppo F19s ची किंमत १९,९९९ रुपये असून, फोनला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.४३ इंच फुल एचडी एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ४८ + २ + २ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट आणि अँड्राइड ११ आधारित ColorOS ११.१ चा सपोर्ट दिला आहे. पॉवरसाठी ३३ वॉट फ्लॅश चार्ज फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. यात ६ जीबी आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते.

OnePlus Nord 2 5G

oneplus-nord-2-5g

OnePlus Nord 2 5G च्या ८ जीबी + १२८ जीबी स्टोरेजची किंमत २९,९९९ रुपये आणि १२ जीबी + २५६ जीबी स्टोरेजची किंमत ३४,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.४३ इंच Full HD+ AMOLED डिस्प्ले, MediaTek Dimensity १२०० AI प्रोसेसर, ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड ११ आधारित Oxygen OS ११.३ वर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ५०+ ८ + २ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

Oppo Reno 6 Pro 5G

oppo-reno-6-pro-5g

Oppo Reno 6 Pro 5G मध्ये ६.५ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोन अँड्राइड ११ आधारित ColorOS ११.१ वर काम करतो. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. यात ६५W SuperVOOC २.० फास्ट चार्जिंग ४५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. Oppo Reno 6 Pro 5G दिवाळी एडिशनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजची किंमत ४१,९९० रुपये आहे.

itel Vision 2S

itel-vision-2s

itel Vision 2S स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच HD+ IPS वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले दिला आहे. यात रियरला ड्यूल कॅमेरा सेटअप दिला असून, याचा प्रायमरी कॅमेरा ८ मेगापिक्सल आहे व दुसरा वीजीए लेंस आहे. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी फोनमध्ये ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात VoLTE/ViLTE/VoWiFi, फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेंसर, ३.५एमएम हेडफोन जॅक आणि मायक्रो यूएसबी चार्जिंग पोर्ट मिळते. फोनची किंमत फक्त ६,९९९ रुपये आहे.

Infinix Hot 11S

infinix-hot-11s

Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये ६.७८ इंच फुल एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०८ पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोन अँड्राइड ११ आधारित XOS ७.६ वर काम करतो. यामध्ये मीडियाटेक हीलियो जी८८ प्रोसेसर दिला आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. इनफिनिक्सच्या या फोनची किंमत जवळपास ११ हजार रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here