भारतात स्मार्टफोन मार्कटमध्ये प्रत्येकच बजेट विभागात वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे स्मार्टफोन उपलब्ध आहे.या फोन्समध्ये एकापेक्षा एक दमदार फीचर्स मिळतात.स्मार्टफोनमध्ये OnePlus चा पर्याय युजर्ससाठी बेस्ट आहे. या फोनमध्ये बॅटरी, शानदार डिस्प्ले, कॅमेऱ्यासह अनेक सर्वोत्तम फीचर्स मिळतात. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले वनप्लस पर्याय उपलब्ध आहेत. सणासुदीच्या सेल पूर्वी Amazon ने OnePlus 8 आणि 9 Series च्या फोनवर १८,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनससह फ्लॅट डिस्काउंट ऑफर केला आहे. एवढेच नाही तर कार्ड पेमेंटवर तुम्ही ७ हजारांपर्यंत कॅशबॅकचा लाभ देखील घेऊ शकता. प्रीमियम कॅमेरा असलेले OnePlus चे टॉप 5 फोन पहा आणि ठरवा तुमच्या आवडीचा आणि बजेटमध्ये येणार स्मार्टफोन कोणता. यात OnePlus 9R 5G, OnePlus 9 5G चा देखील समावेश आहे. पाहा डिटेल्स .

OnePlus Nord CE 5G

oneplus-north-ce-5g

कमी बजेटमध्ये चांगला कॅमेरा असलेला फोन मिळवण्यासाठी तुम्ही OnePlus Nord CE 5G खरेदी करू शकता. त्याची किंमत २४,९९९ आहे. या फोनवर १६,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे आणि सिटी, एक्सिस, एसबीआयसह अनेक बँकांकडून कार्ड पेमेंटवर २००० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे. फोनमध्ये ६४ MP + ८MP + २MP ट्रिपल रियर कॅमेरा आहे. १६ MP सेल्फी कॅमेरा १०८० p व्हिडिओसह फोनचा स्क्रीन आकार AMOLED डिस्प्लेसह ६. ४३ इंच आहे. फोनमध्ये ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. ड्युअल सिम आहेत, त्यापैकी एक 5G नेटवर्कला सपोर्ट करतो.

OnePlus Nord 2 5G

oneplus-nord-2-5g

OnePlus Nord 2 5G २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनवर १६,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे आणि सिटी, एक्सिस, एसबीआयसह अनेक बँकांच्या कार्डच्या पेमेंटवर १५०० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे. या फोनमध्ये सोनी IMX 766 ५० MP+८ MP+२ MP AI ट्रिपल कॅमेरा ३२MP मुख्य कॅमेरा आहे. तसेच, यात नवीन कॅमेरा मोड आहेत. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा कॅमेरा ज्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये MediaTek Dimensity 1200-AI प्रोसेसर आहे. डिस्प्ले ६.४३ इंच आहे. फोनची मेमरी ८ GB आहे आणि स्टोरेज सिस्टम १२८ GB आहे फोनमध्ये ड्युअल सिम आहे आणि ते 5G सिम कार्डला सपोर्ट करते.

OnePlus 8T 5G

oneplus-8t-5g

या फोनची किंमत ४२,९९९ रुपये आहे. पण, डीलमध्ये तो ३८,९९९ मध्ये मिळत आहे. या फोनवर १५,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आहे आणि सिटी, एक्सिस, एसबीआयसह अनेक बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यावर १२५० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे. फोनचा मुख्य कॅमेरा ४८ MP सोनी IMX586 सेन्सर १६ MP अल्ट्रा वाइड अँगल, ५ MP मॅक्रो लेन्स आणि २ MP मोनोक्रोम लेन्स आहे. सोनी IMX471 सेन्सरसह १६ MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनचा स्क्रीन आकार AMOLED डिस्प्लेसह ६.५५ इंच आणि ८ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

OnePlus 9 5G आर्क्टिक स्काय

oneplus-9-5g-आर्क्टिक-स्काय

OnePlus 9 5G हा प्रीमियम श्रेणीचा फोन आहे. ज्याची, किंमत ४९,९९९ रुपये आहे परंतु सेलमध्ये ४६,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनवर १८,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि सिटी, एक्सिस, एसबीआय, अमेरिकन एक्सप्रेससह अनेक बँकांकडून कार्ड पेमेंटवर ७००० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे. या फोनमध्ये ४८ एमपी मुख्य कॅमेरा, ५० एमपी अल्ट्रा वाइड एंगल कॅमेरा विथ फ्री फॉर्म लेन्स, २ एमपी मोनोक्रोम कॅमेरा आणि १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. AMOLED डिस्प्लेसह फोनचा स्क्रीन आकार ६.५५ इंच आहे. फोनमध्ये अँड्रॉइड ११ आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम आणि ६५०० एमएएच बॅटरी ६५ डब्ल्यू वॉर्प चार्जिंगसह आहे.

OnePlus 9R 5G लेक ब्लू 8 GB रॅम, 128 GB स्टोरेज

oneplus-9r-5g-lake-blue-8-gb-ram-128-gb-स्टोरेज

फोनची किंमत ३९,९९९ आहे. पण, डीलमध्ये ३६,९९९ मध्ये उपलब्ध आहेत. या फोनवर १८,००० रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस आणि सिटी, एक्सिस, एसबीआय, अमेरिकन एक्सप्रेससह अनेक बँकांकडून कार्ड पेमेंटवर २००० रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक आहे. OnePlus 9R 5G चा कॅमेरा ४८ एमपी मुख्य कॅमेरा, १६ एमपी अल्ट्रा वाइड एंगल कॅमेरा, ५ एमपी मॅक्रो कॅमेरा आणि २ एमपी मोनोक्रोम कॅमेरासह १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. AMOLED डिस्प्लेसह फोनचा स्क्रीन आकार ६.५५ इंच आहे. ६५ डब्ल्यू वॉर्प चार्जिंगसह ४५०० एमएएच बॅटरी आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 11 आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here