टाटा स्कायच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सची किंमत वाढली आहे. कंपनीने मल्टी टीव्ही कनेक्शनच्या दरातही वाढ केली आहे. टाटा स्काय एसडी मल्टी टीव्ही कनेक्शनची किंमत आता १३९९ रुपये झाली आहे. याआधी ही किंमत १२९९ रुपये होती. नवी किंमत टाटा स्कायच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता. एचडी मल्टी टीव्ही कनेक्शनची नवी किंमत आता ११९९ रुपये झाले आहे. याआधी ही किंमत ९९९ रुपये होती. मल्टी टीव्ही कनेक्शनच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती DreamDTH ने दिली आहे. एसडी आणि एचडी सेटटॉप बॉक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता टाटा स्कायसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. टाटा स्कायच्या एचडी (हाय डेफिनेशन) सेटटॉप बॉक्सची किंमत आधी १३९९ रुपये होती. परंतु, आता ही किंमत १४९९ रुपयांवर पोहोचली आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने सेटटॉप बॉक्सच्या किंमतीत कपात केली होती.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times