सध्या स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडची लोकप्रियता वाढत चालली आहे. अशात जर तुम्ही नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स कंपनी Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू असून, या सेलमध्ये अनेक प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळत आहे. Amazon च्या सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत शानदार स्मार्टवॉच खरेदी करू शकता. विशेष म्हणजे एकापेक्षा एक शानदार फीचर्ससह येणाऱ्या या वॉचची किंमत फक्त १,५०० रुपयांपासून सुरू होते. या किंमतीत तुम्हाला Noise ColorFit Pulse, boAt Xtend, Fire-Boltt Ring, Crossbeats Orbit आणि Amazfit GTS2 Mini स्मार्टवॉचचा समावेश आहे. या स्मार्टवॉचेसमध्ये तुम्हाला हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स, स्पोर्ट्स मोड्स, ऑक्सिजन लेव्हल, स्ट्रेस आणि स्लिप ट्रॅकिंग सारखे शानदार फीचर्स मिळतात. सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या या वॉचविषयी सविस्तर जाणून घेऊया.

नॉइज कलरफिट पल्स

noise-colorfit-Ples

कमी किंमतीत चांगली फिटनेस वॉच खरेदी करायची असल्यास Noise ColorFit Pulse तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. या वॉचची किंमत ४,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त १,६९९ रुपयात खरेदी करू शकता. वॉचवर जवळपास ७५ टक्के डिस्काउंट मिळत आहे. या फिटनेस वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंग फीचर मिळते. याशिवाय हार्टबीट ट्रॅकिंग, स्लीप पॅटर्न आणि स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंगची सुविधा मिळते. वॉचमध्ये १.४ इंच फुल टच HD डिस्प्ले आणि १० दिवसांची बॅटरी लाइफ दिली आहे.

boAt Xtend

बोट-विस्तार

boAt Xtend स्मार्टवॉच देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. ७,९९० रुपये किंमतीच्या या फिटनेस वॉचला तुम्ही फक्त २,१९९ रुपयात खरेदी करू शकता. बोटच्या या वॉचमध्ये १,६९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याशिवाय इन-बिल्ट अ‍ॅलेक्सा सपोर्ट मिळतो. या फिटनेस वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंगची सुविधा मिळते. याशिवाय हार्टबीट ट्रॅकिंग, स्लीप पॅटर्न, फीमेल्स पीरियड सायकल ट्रॅक आणि स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंगची देखील सुविधा यात दिली आहे.

फायर-बोल्ट रिंग

फायर-बोल्ट-रिंग

Fire-Boltt च्या या स्मार्टवॉचची किंमत ९,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये फक्त ३,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टवॉचमध्ये बिल्ट-इन स्पीकर आणि मायक्रोफोन दिला आहे. यामुळे कॉल करणे व रिसिव्ह करण शक्य आहे. सोबतच, या वॉचमध्ये एक डायल पॅड आहे, ज्याद्वारे कॉन्टॅक्ट पाहता येतील. या फिटनेस वॉचद्वारे ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅक करू शकता. वॉचमध्ये शानदार हेल्थ फीचर्स आणि स्पोर्ट्स मोड मिळतात.

क्रॉसबीट्स ऑर्बिट

क्रॉसबीट्स-ऑर्बिट

Crossbeats Orbit ची किंमत ९,९९९ रुपये आहे. मात्र अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये ६० टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही वॉचला ३,३९९ रुपयात खरेदी करू शकता. या वॉचला तुम्ही थेट स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. या वॉचमध्ये इन-बिल्ट माइक आणि स्पीकरसह डायल पॅडवरून नंबर डायल करून कॉल करू शकता. वॉचमध्ये १.३ इंच HD IPS डिस्प्ले दिला आहे. यात एचआर ट्रॅकर, बीपी मॉनिटर, एसपीओ२ लेव्हल मॉनिटरसह अनेक हेल्थ फीचर्स दिले आहेत.

Amazfit GTS2 Mini

amazfit-gts2-mini

या शानदार स्मार्टवॉचची किंमत ९,९९९ रुपये असून, सेलमध्ये ४० टक्के डिस्काउंटनंतर फक्त ५,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फिटनेस वॉचमध्ये ब्लड ऑक्सिजन लेव्हल ट्रॅकिंगची सुविधा मिळते. यात हार्टबीट ट्रॅकिंग, स्लीप पॅटर्न, फीमेल्ससाठी पीरियड सायकल ट्रॅकिंग आणि स्ट्रेस लेव्हल मॉनिटरची सुविधा मिळते. यात इन-बिल्ट अ‍ॅलेक्सा आणि जीपीएस सारखे फीचर्स दिले असून, याची बॅटरी २१ दिवस टिकते. यामध्ये १.५५ इंच AMOLED डिस्प्ले दिला असून, वॉच पाण्यापासून सुरक्षित राहते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here