सध्या सणांच्या निमित्ताने वेगवेगळ्या ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सेलचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने देखील सेलचे आयोजन केले असून, या सेलमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंट मिळेल. तुम्ही जर नवीन इयरबड्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सेलमध्ये तुम्ही कमी किंमतीत शानदार इयरबड्स खरेदी करू शकता. गेल्या काही दिवसात वायरलेस इयरबड्सची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे कंपन्या देखील कमी किंमतीत शानदार फीचर्ससह येणारे इयरबड्स लाँच करत आहेत. ई-कॉमर्स साइट्सवरून तुम्ही Quantum SonoTrix X, Dizo Buds Z, Crossbeats EPIC, pTron Basspods 992, OPPO Enco Buds आणि VingaJoy BT-210 JAZZ BUDS 2.0 ला स्वस्तात खरेदी करू शकता. या दमदार बॅटरी लाइफसह येणाऱ्या इयरबड्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

क्वांटम सोनोट्रिक्स एक्स

क्वांटम-सोनोट्रिक्स-x

Quantum SonoTrix X इयरबड्सची किंमत फक्त १,३५० रुपये आहे. हे एक ट्रू वायरलेस इयरबड्स आहेत. या सोबत पॉवरफुल बास आणि क्लिअर साउंडचा सपोर्ट मिळते. इयरबड्समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५ दिलाअसून, अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. इयरबड्सचे वैशिष्ट्यं म्हणजे चार्जिंग केससोबत याची बॅटरी लाइफ ४२ तास टिकते. Quantum SonoTrix X वायरलेस इयरबड्समध्ये कॉलिंगसाठी ड्यूल माइकचा सपोर्ट दिला आहे.

डिझो बड्स झेड

dizo-buds-z

Realme Dizo Buds Z ट्रू वायरलेस स्टीरियो इयरबड्समध्ये १०एमएम चे डायनॅमिक ड्रायव्हर आणि बास Boost+ फीचर दिले आहेत. यामध्ये एनवायरमेंटल नॉइज कॅन्सिलेशनचा (ENC) सपोर्ट मिळतो. लीफ, ऑनिक्स आणि पर्ल रंगात येणाऱ्या या इयरबड्सला फ्लिपकार्टवरून १,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

क्रॉसबीट्स EPIC

Crossbeats EPIC मध्ये तीन नॉइज कॅन्सिलेशन मोड दिले आहेत. यात १३ एमएम ड्रायव्हर, एकूण ६ मायक्रोफोन, २४ तासांची बॅटरी लाफ मिळते. इयरबड्सची किंमत ४,४९९ रुपये आहे.

pTron Basspods 992

ptron-basspods-992

pTron Basspods 992 एक बजेट वायरलेस इयरबड्स असून, यासोबत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशनचा (ANC) सपोर्ट दिला आहे. या इयरबड्सला अ‍ॅमेझॉनवरून फक्त १,३९९ रुपयात खरेदी करू शकता. उजव्या इयरबड्सला दोन सेकंद टच करून तुम्ही अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सिलेशन आणि ट्रांसपरेंसी मोडला सुरू करू शकता. यात ANC आधीपासूनच बंद मिळते. कॉलिंग आणि ऑडिओसाठी यामध्ये ४ माइक दिले आहेत. pTron Basspods 992 वायरलेस इयरबड्समध्ये २० तास बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे.

OPPO एन्को बड्स

oppo-enco-buds

OPPO Enco Buds सोबत २४ तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे. यात AAC कोडेक आणि नॉइज कॅन्सिलेशन सारखे फीचर्स दिले आहे. OPPO Enco Buds ची किंमत १,४९९ रुपये असून फ्लिपकार्टवरून १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. यात क्रिस्टल क्लिअर आणि कंसर्ट ऑडिओ मिळतो. चार्जिंग केससोबत २४ तासांची बॅटरी लाइफ मिळते. तर प्रत्येक इयरबड्सला तुम्ही ६ तास वापरू शकता. याच्या चार्जिंग केसमध्ये ४०० एमएएच आणि इयरबड्समध्ये ४० एमएएचची बॅटरी दिली आहे.

विंगाजॉय BT-210 JAZZ BUDS 2.0

vingajoy-bt-210-jazz-buds-2-0

VingaJoy BT-210 JAZZ BUDS 2.0 ची किंमत १,९९९ रुपये आहे. कंपनीचा दावा आहे की, यात ट्रू बास मिळेल व सॉफ्ट सिलिकॉन इयरकप दिले आहेत. इयरबड्स वजनाला हलके असून, खास खेळाडूंसाठी डिझाइन केले आहेत. यात डिजिटल बॅटरी डिस्प्ले देखील दिला आहे. तसेच, यात क्रिस्टल क्लिअर साउंड आणि डीप बासचा देखील दावा केला आहे. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १५ तास टिकते. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here