नवी दिल्लीः सॅमसंगचा लेटेस्ट स्मार्टफोन () चा आज पहिला सेल आहे. ग्राहकांना या सेलमध्ये एस२० खरेदी केल्यानंतर जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहे. तसेच हा फोन नोकॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरवर खरेदी केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, भारतात या फोनची प्री बुकिंग आधीच सुरू करण्यात आली होती.

Galaxy S20 ची किंमत व वैशिष्ट्ये

फोनमध्ये ६.२ इंचाचा क्वॉड एचडी प्लस डायनॅमिक AMOLED 2x डिस्प्ले देण्यात आला आहे. फुल एचडी रिझॉल्युशनचा हा फोन 120Hz चा रिफ्रेश रेटसोबत येतो. फोनचा डिस्प्ले HDR10+ सर्टिफाइड आहे. ८ जीबी आणि १२ जीबी रॅमचा पर्यायसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत लाँच करण्यात आला आहे. फोनची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी एस२० मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १२ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देण्यात आला आहे. कॅमेरा 30x के डिजिटल झूम आणि 3x चे हायब्रिड ऑप्टिकल झूम आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. २५ वॅटची फास्ट चार्जिंगसह 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत भारतात ६६ हजार ९९९ रुपये आहे.

या ऑफर्स मिळणार

सॅमसंगने या सीरिज अंतर्गत फोन बुक करणाऱ्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स दिल्या आहेत. Galaxy S20 प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Buds+ ट्रू वायरलेस ईयरबड्स २ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच सॅमसंग केअरचे सब्सक्रिप्शन १ हजार ९९९ रुपयांत मिळणार आहे. Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना गॅलेक्सी बड्स प्लस ट्रू वायरलेस ईयरबड्स आणि सॅमसंग केअर प्लस सब्सक्रिप्शन १ हजार ९९९ रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here