रेनॉ किगर विरुद्ध टाटा पंच: SUV कार खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत अलिकडे वाढ होताना दिसत आहे. असं असलं तरी SUV अद्यापही कमी व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे नवी SUV कार खरेदी करणाऱ्यांचा कल आता लहान आकाराच्या SUV खरेदीकडे वाढल्याचं दिसून येतंय. Tata Punch आणि Renault Kiger या दोन लहान आकाराच्या SUV आता ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय आहेत.  या दोन कार्समध्ये काय विशेष आहे ते जाणून घेऊया.

लूक
जर कारच्या लूकचा विचार केला तर दोन्ही मॉडेलमध्ये हॅन्डलॅम्प आणि डीआरएलच्या माध्यमातून वेगळंपण दर्शवतात. दोन्ही कार्य या प्रीमियम एसयूव्हीपेक्षा वेगळ्या आहेत, त्यापेक्षा अधिक आकर्षक वाटतात. दोन्ही कार्समध्ये रुफ रेल्स आणि काही प्रमाणात क्लोडिंग जोडण्यात आलं आहे. लांबी आणि रुंदीचा विचार करता तुलनेने किगर ही पंच पेक्षा थोडी मोठी आहे. दोन्ही कार्समध्ये 16 इंचाचा अलॉय व्हील आहे आणि ड्यूअल टोन कलर याच्या लूकला अधिक आकर्षित बनवतो.

Tata Punch आणि Renault Kiger, कोणती कार अधिक चांगली? काय आहे या दोघांचं वैशिष्ट्यं

इंटेरिअर
पंचचा विचार करता कायगरच्या तुलनेत ती अधिक कलरमध्ये उपलब्ध आहे आणि त्याचे डिझाईन देखील वेगळं आहे. यामध्ये कलर्ड वेंट्स आणि डॅशबोर्ड पूर्णपणे पांढऱ्या रंगात बनवण्यात आलं आहे. किगरमध्ये एक मोठ्या स्क्रीनचा वापर करण्यात आला आहे तर पंचमध्ये एक डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट आहे. केबिनमध्ये आकर्षक स्पेससोबतच चांगल्या गुणवत्तेची इंटेरियर आहे. या दोन्ही कार्समध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, क्लायमेट कन्ट्रोल, रियर व्यू कॅमेरा, क्रुझ कन्ट्रोल देण्यात आलं आहे.

Tata Punch आणि Renault Kiger, कोणती कार अधिक चांगली? काय आहे या दोघांचं वैशिष्ट्यं

इंजिन
पंचमध्ये 1.2 लिटर पेट्रोलसहित 83hp पॉवर आणि 113 Nm टॉर्क तसेच 5-speed AMT या प्रकारातील इंजिनचा वापर करण्यात आला आहे. कायगरमध्ये दोन प्रकारच्या इंजिनचा वापर करण्यात आला आहे. पहिले इंजिन 1.0 लिटर पेट्रोल, त्यामध्ये 72 ps पॉवर आणि 160nm टॉर्क जनरेट होतंय तर दुसऱ्या प्रकारात 1.0 लिटर इंजिन आहे ज्यामध्ये 100 ps पॉवर आणि  160nm टॉर्क इंजिन वापरण्यात आलं आहे.

Tata Punch आणि Renault Kiger, कोणती कार अधिक चांगली? काय आहे या दोघांचं वैशिष्ट्यं

किंमत
पंचची किंमत ही 5.4 लाखांपासून ते 9.3 लाखांपर्यंत आहे. किगरची किंमत ही 5.6 लाख ते 9.8 लाख रुपयापर्यंत आहे. ऑफ रोडचा विचार करता तसेच तुलनेने जास्त स्पेसचा विचार करता टाटा पंच हा चांगला पर्याय आहे. कायगर थोडीसी महाग आहे पण फिचर्सचा विचार करता कायगर अधिक चांगला पर्याय आहे.

Tata Punch आणि Renault Kiger, कोणती कार अधिक चांगली? काय आहे या दोघांचं वैशिष्ट्यं

संबंधित बातम्या :

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here