नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी (Motorola) ने जी सीरिज अंतर्गत लेटेस्ट ला ब्राझीलमध्ये लाँच केले आहे. कंपनीने या फोनमध्ये जबरदस्त प्रोसेसर, एचडी डिस्प्ले आणि तीन रियर कॅमेरे दिले आहे. कंपनी लवकरच मोटो जी८ स्मार्टफोन यूरोप, अमेरिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजारात लाँच करणार आहे. याआधी कंपनीने मोटी जी५ प्लस, मोटो जी४ यासारखे फोन बाजारात उतरवले होते.

कंपनीने या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २० हजार ८०० रुपये ठेवली आहे. तसेच ग्राहकांना हा फोन न्यूओन ब्लू आणि पर्ल व्हाइट या दोन रंगात उपलब्ध होणार आहे. मोटोरोलाच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा एचडी प्लस पंचहोल डिस्प्ले असणार आहे. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ एसओसी आणि चार जीबी रॅमचा सपोर्ट दिला आहे. हा फोन स्टॉक अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. या फोनमध्ये फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

मोटोरोलाने या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी VoLTE, 3.5 एमएम जॅक, वायाफाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट यासारखे फीचर्स दिले आहेत. युजर्संना या फोनमध्ये ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. फास्ट चार्जिंगसाठी १० वॅटची फास्ट चार्जिंग फीचर देण्यात आले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here