नवी दिल्लीः सोशल मीडियातील व्हॉट्सअॅपचे २०० कोटीहून अधिक अॅक्टिव युजर्स आहेत. जगातील प्रसिद्ध मेसेजिंग अॅप आहे. यात अनेक जबरदस्त फीचर मिळतात. यापैकी एक म्हणजे, होय. कंपनीने २०१७ साली सुरू केलेले हे फीचरद्वारे स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम स्टोरीज अंतर्गत फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणून ठेवता येवू शकते. हे स्टेट्स २४ तास राहते. अनेकदा आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणीचे स्टेट्स आवडते. परंतु, ते डाउनलोड करता येत नाही. त्यामुळे अनेकदा निराश व्हावे लागते. स्टेट्स सेव्ह करण्याचे फीचर अद्याप आले नाही. परंतु, फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन ते फोनमध्ये गॅलरीमध्ये सेव्ह करता येऊ शकता येते. व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊन काही फायदा होणार नाही. त्यामुळे काही खास ट्रिकचा वापर केल्यास ते स्टेट्स फोनमध्ये सेव्ह करता येऊ शकता येते.

असं सेव्ह करा फोनमध्ये व्हॉट्सअॅप स्टेट्स

– प्ले स्टोर मध्ये जावून Google Files अॅपला डाउनलोड करा
– अॅप ओपन करा आणि टॉप राइट कॉर्नर मध्ये दिलेल्या मेन्यू ऑप्शन वर जा
– Settings ऑप्शन मध्ये जावून Show hidden files ऑप्शनला ऑन करा
– यानंतर अॅपमध्ये डावीकडे जा आणि खाली दिलेल्या Browse वर टॅप करा
– येथून मध्ये जा
– आता नावाच्या फोल्डरमध्ये जावून Media मध्ये जा
– येथे Statuses फोल्डर दिसेल
– या फोल्डर मध्ये तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींचे व्हॉट्सअॅप स्टेट्स दिसेल
– तुम्हाला जो फोटो किंवा व्हिडिओ ओपन करायचा आहे. त्या नावाच्या पुढे डाउनलोडचा पर्याय (v) वर टॅप करा
– या ठिकाणी खूप सारे पर्याय उघडे होतील. ज्यात Copy To या पर्यायाची निवड करा
– आता Internal Storage ची निवड करा. तुमच्या पसंतीच्या फोल्डरमध्ये सेव्ह करा.

टीपः ही खास ट्रिक केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here