फोनची किंमत

फोनची मूळ किंमत ६,४९९ रुपये आहे. मात्र, जवळपास याच किंमतीत Nokia 8110, Samsung Galaxy M01 Core, itel A26, Micromax iOne सारखे अँड्राइड फोन्स उपलब्ध आहेत. मात्र, ईएमआय आणि बंडल डेटा ऑफरसह कंपनी फोनला स्वस्त दाखवत आहे. ग्राहकांना फोन खरेदीसाठी Always-On plan, Large plan, XL plan आणि XXL असे चार प्लान्स मिळतात. कंपनीचे हे ईएमआय प्लान्स डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्ससह येतात.
ईएमआयसह जिओ ग्राहकांना १,९९९ रुपयांसह जिओफोन नेक्स्ट खरेदी करणे सोपे करत आहे. मात्र, ग्राहकांना महिन्याला ईएमआय + ५०१ रुपये ईएमआय प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. ही रक्कम जास्त होते. सर्व कमी ईएमआय प्लानवर फोन खरेदी केला तरीही ही रक्कम ९,१९९ रुपयांपर्यंत जाते.
ईएमआय प्लान्स

नेहमी योजनेवर: या प्लानमध्ये २४ महिने ३०० रुपये आणि १८ महिने ३५० रुपये दरमहिन्याला भरावे लागतील. या दोन्ही प्लान्सला निवडल्यास फोनची किंमत क्रमशः ९,७०० रुपये आणि ८,८०० रुपये होईल. (यात ईएमआय + डाउन पेमेंट + ५०१ रुपये प्रोसेसिंग फीचा समावेश आहे.)
मोठी योजना: या प्लानमध्ये २४ महिने ४५० रुपये आणि १८ महिन्यांसाठी ५०० रुपये दरमहिना द्यावा लागेल. या प्लान्सची निवड केल्यास फोन १३,३०० रुपये आणि ११,५०० रुपये किंमतीला पडेल. (यात ईएमआय + डाउन पेमेंट + ५०१ रुपये प्रोसेसिंग फीचा समावेश आहे.)
इतर ईएमआय प्लान्स

XL योजना: या प्लानमध्ये २४ महिने ५०० रुपये आणि १८ महिने ५५० रुपये दरमहिन्याला द्यावे लागेल. यामुळे फोनची किंमत क्रमशः १४,५०० रुपये आणि १२,४०० रुपये होईल. (यात ईएमआय + डाउन पेमेंट + ५०१ रुपये प्रोसेसिंग फीचा समावेश आहे.)
XXL योजना: या प्लानमध्ये २४ महिने ५५० रुपये आणि १८ महिने ६०० रुपये दरमहिन्याला द्यावे लागतील. या प्लान्सची निवड केल्यास फोनची किंमत क्रमशः १५,७०० रुपये आणि १३,३०० रुपयांपर्यंत जाईल. (यात ईएमआय + डाउन पेमेंट + ५०१ रुपये प्रोसेसिंग फीचा समावेश आहे.)
ईएमआयसह मिळेल डेटा बेनिफिट्स

तुम्ही जर ईएमआयचा पर्याय न निवडल्यास फोनसाठी केवळ ६,४९९ रुपये द्यावे लागतील. तसेच, अतिरिक्त प्रोसेसिंग फी देखील वाचेल. ईएमआयचा पर्याय निवडल्यास त्यासोबत अतिरिक्त डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळतो.
नेहमी योजनेवर: या प्लानमध्ये दरमहिना ५ जीबी डेटा आणि १०० मिनिटं कॉलिंगची सुविधा मिळते.
मोठी योजना: यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
XL योजना: प्लानमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.
XXL योजना: यामध्ये दररोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.
JioPhone Next चे स्पेसिफिकेशन

या फोनमध्ये ५.४५ इंच टचस्क्रीन एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ७२०x१४४० पिक्सल आहे. यात रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन QM-२१५ SoC, २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज, ३५०० एमएएचची बॅटरी, ड्यूल सिम सपोर्ट, मायक्रोयूएसबी, ३.५ हेडफोन जॅक सपोर्ट, प्रगतीओएस, गुगल प्ले स्टोर, युट्यूब आणि इतर फीचर्स मिळतात.
ग्राहकांना फोन खरेदीसाठी जिओ मार्ट डिजिटल स्टोर अथवा Jio.com/nextवर जावे लागेल. तसेच, ७०१८१७०१८२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर Hi लिहून पाठवावे. कन्फर्मेशननंतर फोनसाठी जिओमार्ट रिटेलरकडे जावे लागेल.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times