सणांच्या काळात कपडे, गॅजेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू अशी भरपूर खरेदी केली जाते. काहीजण इतरांना देण्यासाठी खरेदी करतात तर काहीजण स्वतःलाच गिफ्ट देतात. तुम्ही जर या दिवाळीला नवीन गॅजेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही या दिवाळीला कमी किंमतीत येणाऱ्या स्मार्टवॉच खरेदी करू शकता. ५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या वॉचमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कॉलिंग, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि टेंप्रेचर मॉनिटर सारखे अनेक शानदार फीचर्स मिळतात. ५ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला DIZO Watch 2, Crossbeats Ignite S3, Zebronics ZEB-FIT7220CH, Amazfit Bip U आणि TAGG Verve Plus या वॉच मिळतील. दिवाळीच्या निमित्ताने या वॉच तुमच्यासाठी सर्वोत्तम गिफ्ट ठरतील. कमी बजेटमध्ये येणाऱ्या या वॉचविषयी सविस्तर जाणून घेऊया.

डिझो वॉच 2

dizo-watch-2

DIZO Watch 2 ची किंमत २,९९९ रुपये आहे, परंतु दिवाळी ऑफर अंतर्गत २,२९९ रुपयात खरेदी करू शकता. या वॉचमध्ये १.६९ इंच डिस्प्ले दिला असून, याचा ब्राइटनेस ६०० निट्स आहे. डिस्प्लेवर २.५डी ग्लास आहे. यात २० एमएमचे स्ट्रॅप दिले आहेत. वॉचचे वजन ५२ ग्रॅम असून, यात १०० डायनॅमिक फेसेज मिळते, जे कस्टमाइजेबल आहेत. वॉचमध्ये १५ स्पोर्ट्स मोड दिले आहेत. तसेच, २४x७ हार्ट रेट मॉनिटरसह स्लीप ट्रॅकिंग आणि SpO2 ट्रॅकर मिळेल. वॉचने म्यूझिकसह फोनचा कॅमेरा देखील कंट्रोल करू शकता. वॉच पाण्यात सुरक्षित राहते.

क्रॉसबीट्स इग्नाइट S3

crossbeats-ignite-s3

Crossbeats Ignite S3 मध्ये स्क्वेअर डायल दिले असून, यात १.७ इंच डिस्प्ले मिळतो. वॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर दिले आहे, म्हणजे तुम्ही स्मार्टवॉचद्वारे बोलू शकता. यात स्ट्रेस मॉनिटरिंग, २४x७ हार्ट रेट मॉनिटरसह ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि महिलांच्या आरोग्यासंबंधी ट्रॅकिंगची फीचर मिळते. या वियरेबल्समध्ये ब्लड प्रेशर ट्रॅकर देखील दिले आहे. तसेच, अनेक स्पोर्ट्स मोड देखील यात दिले आहेत. Crossbeats Ignite S3 स्मार्टवॉचची किंमत ४,४९९ रुपये आहे.

Zebronics ZEB-FIT7220CH

zebronics-zeb-fit7220ch

Zebronics ZEB-FIT7220CH ची किंमत ३,९९९ रुपये असून, यात १.७५ इंच डिस्प्ले दिला असून, यावर २.५डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन मिळते. यात १०० वॉच फेसेज मिळतात. ब्लूटूथ कॉलिंगसाठी माइक आणि स्पीकर देखील दिले आहेत. वॉचमध्ये कॉलरच्या आयडीची देखील माहिती मिळते. या वॉचद्वारे तुम्ही फोनच्या कॅमेरा आणि म्यूझिकला कंट्रोल करू शकता. तसेच, ZEB-FIT 20 सीरिज अ‍ॅपसह वॉच कंट्रोल करता येईल. यात ब्लूटूथ वी५ आणि वी३ चा सपोर्ट दिला असून, डिव्हाइसमध्ये दिलेली २१० एमएएचची बॅटरी स्टँडबायवर ३० दिवस टिकते.

Amazfit Bip U

amazfit-bip-u

Amazfit Bip U स्मार्टवॉच सध्या ३,९९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यामध्ये मोठा कलर TFT LCD डिस्प्ले दिला असून, यात ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचर मिळते. ही वॉच ब्लॅक, ग्रीन आणि पिंक अशा तीन कलर व्हेरिएंटमध्ये येते. वॉच अँड्राइडसह आयओएसवर देखील वापरू शकता. डिव्हाइस ५ एटीएम वॉटर रेसिस्टेंट आहे. तसेच, यावर कॉलिंगपासून फोनवर येणाऱ्या सर्व नॉटिफिकेशनची माहिती मिळते. या दिवाळीला ही वॉच खरेदी करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

TAGG Verve Plus

टॅग-व्हर्व्ह-प्लस

TAGG Verve Plus ची किंमत २,४९९ रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर फक्त १,८९९ रुपयात खरेदी करू शकता. या वॉचमध्ये २४x७ बॉडी टेंप्रेचर, रियल टाइम SpO2 मॉनिटरिंग आणि हार्ट रेट मॉनिटरसह ब्लड प्रेशर मॉनिटर फीचर दिले आहे. यात स्लीप ट्रॅकिंग, फीमेल हेल्थ ट्रॅकिंग आणि गोल ट्रॅकर्स सारखे फीचर्स देखील आहेत. वॉचमध्ये १६ स्पोर्ट्स मोड दिले आहे. यामध्ये १.६९ इंच अल्ट्रा वाइड आयपीएस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२८० पिक्सल आणि ब्राइटनेस ५०० निट्स आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here