फेसबुकचे प्रवक्त्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सिंगापूर येथील मरीना वन ऑफिस मध्ये शुक्रवारी एका कर्मचाऱ्याला करोना व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या कर्मचाऱ्याला सध्या १३ मार्चपर्यंत कार्यालयात न येण्यास सांगितले आहे. कार्यालयात येण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करण्यास सांगतिले आहे. ज्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. तो २३ ते २६ फेब्रुवारीपर्यंत लंडन कार्यालयात गेला होता. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून लंडन कार्यालय सोमवारपर्यंत बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. या दोन दिवसात कार्यालयाची सफाई करण्यात येणार आहे, या दरम्यान फेसबुकचे कर्मचारी घरूनच काम करतील, असे प्रवक्त्याने सांगितले आहे.
याआधी फेसबुकने अनिश्चित काळासाठी शांघाय मधील कार्यालय बंद केले आहे. इटली आणि दक्षिण आफ्रिकाचे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सॅन फ्रान्सिस्को येथील कर्मचाऱ्यांनाही घरातून काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times