नवी दिल्लीः इलेक्ट्रॉनिक कंपनी केडीएमने भारतीय बाजारात १०००० mAh क्षमतेचा 10X लाँच करण्यात आला आहे. या पॉवरबँकने एकाचवेळी दोन मोबाइल चार्ज करता येऊ शकणार आहे. यात दोन USB-A देण्यात आले आहेत. यात शॉट सर्किट, ओव्हर व्होल्टेज, ओव्हर करंट, ओव्हर चार्ज, ओव्हर डिस्चार्ज, ओव्हर हिटिंग होण्याची आजिबात भीती नाही, असे कंपनीने सांगितले आहे. याची किंमत १४९९ रुपये आहे. तसेच कंपनी यावर ६ महिन्यांची वॉरंटी सुद्धा देत आहे.
या पॉवर बँकमध्ये लिथयम आयन सेल देण्यात आले आहेत. यात बॅटरची परफॉर्मन्स जबरदस्त आहे. या पॉवरबँकने एकाचवेळी दोन स्मार्टफोन चार्ज करता येऊ शकता येते. पॉवर बँकसह मोबाइल फोनसोबत MP3 प्लेयर, ब्लूटूथ हेडफोन, डिजिटल कॅमेरा, आयपॅड, आयफोन आणि अन्य डिव्हाइस चार्ज करता येऊ शकते. याची बॉडी फायर रिजिस्टंट आहे. यात LED इंडीकेटर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे यात किती पॉवर वाचला आहे, हे समजते. पॉवर बँक २ ते ३ तासात फुल चार्ज होतो. ब्लॅक आणि व्हाइट कलर्समध्ये हे पॉवर बँक खरेदी करता येऊ शकता येते. पॉवर बँकसोबत एक मायक्रो यूएसबी केबल मिळते.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times