नवी दिल्लीः सेल्टॉसनंतर किआ मोटर्सने आपली प्रीमियम एमपीव्ही भारतीय बाजारात खूप वेगाने प्रसिद्ध होत आहे. सेल्स रिपोर्टच्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात कार्निवालची १६२० गाड्यांची विक्री झाली आहे. तर टोयोटा फॉर्च्युनरची १५१० गाड्यांची विक्री झाली आहे. त्यामुळे विक्रीमध्ये कार्निवालने फॉर्च्युनरला मागे टाकले आहे.

किआ कार्निवालला दिल्ली ऑटो एक्स्पो २०२० मध्ये लाँच करण्यात आले होते. या कारची एक्सशो रुम किंमत २४.९५ लाख रुपये आहे. तर या कारच्या टॉप व्हेरियंट कार्निवाल लिमोजीनची किंमत ३३.९५ लाख रुपये आहे. ही गाडी तीन प्रकारात म्हणजेच प्रीमियम, प्रेस्टीज आमि लिमोजीन आणि ७, ८ आणि ९ सीट अशा तीन पर्यायात उपलब्ध करण्यात आली आहे. कार्निवल अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. बुकिंग सुरू होण्याआधीच १४०० कारची विक्री झाली होती. बाजारात लाँच झाल्यानंतर या कारची मोठी विक्री झाली. फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली.

कार्निवालमध्ये २.२ लीटरचे व्हीजीटी डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे २०० पीएसचे पॉवर आणि ४०० एनएमचे टॉर्क जनरेट करते. हे बीएस६ इंजिन आहे. यात ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. या प्रीमियम कारमध्ये ७ आणि ९ सीटरचा पर्याय आहे. प्रेस्टिजमध्ये ७ आणि ९ सीटरचा पर्यात तर लिमोजीन मध्ये ७ सीटरचा पर्याय उपलब्ध आहे. या कारच्या फीचर्सवर एक नजर टाकल्यास यात ट्राय-झोन ऑटोमॅटिक एसी, स्मार्ट क्रूझ कंट्रोल, ८ इंचाचा टचस्क्रीन इन्फोनमेंट सिस्टम रियर पॅसेंजर दिले आहे. कारमध्ये वायरलेस चार्जर, ३६० डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल, स्टेबिलिटी मॅनेजमेंट यासारख्ये आधुनिक फीचर्स दिल आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here