दिवाळीत जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. सॅमसंग, शाओमी, विवो आणि ओप्पो सारख्या कंपन्यांच्या शानदार फोन्सला तुम्ही १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. विशेष म्हणजे दिवाळी ऑफर अंतर्गत ग्राहकांना १२ हजार रुपयांपर्यंतच्या स्मार्टफोन्सवर ६ हजार रुपये कॅशबॅक देखील मिळत आहे. एअरटेल ऑफर्ससह या स्मार्टफोन्सची सुरुवाती किंमत फक्त १,६९९ रुपये आहे. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही इतरांना गिफ्ट देण्यासाठी देखील हे फोन्स खरेदी करू शकता. १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला Tecno Spark Go 2021, Oppo A15, SAMSUNG Galaxy F02s, Vivo Y71i, OPPO A11K, Motorola Moto E7 Plus, Lava Z6, Redmi 9 Prime, Samsung Galaxy M02s आणि Lenovo A6 Note हे फोन्स मिळतील. या फोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Tecno Spark Go 2021

tecno-spark-go-2021

७,६९९ रुपये किंमतीच्या या फोनला एअरटेल कॅशबॅक ऑफरसह १,६९९ रुपयात खरेदी करू शकता. अँड्राइड १० गो एडिशनवर काम करणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो ए२० चिपसेट मिळतो. फोनमध्ये ६.५२ इंच डिस्प्ले दिला आहे. यात २ जीबी रॅम मिळते. टेक्नोच्या फोनमध्ये १३ मेगापिक्सल रियर आणि ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात ५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Oppo A15

३ जीबी रॅमसह येणाऱ्या फोनची किंमत १०,९९० रुपये आहे, मात्र ऑफरनंतर फक्त ४,९९० रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ६.५२ इंच डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर, ४२३० एमएएच बॅटरी आणि १३ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

SAMSUNG Galaxy F02s

samsung-galaxy-f02s

या फोनची किंमत ९,४९९ रुपये असून, एअरटेल ऑफरसह ३,४४९ रुपयात मिळेल. यात ६.५० इंच डिस्प्ले, ३ जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन ४५० चिपसेट आणि ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे.

मी Y71i राहतो

फोनची किंमत १०,९०० रुपये असून, एअरटेल ऑफर अंतर्गत २ जीबी रॅमसह येणाऱ्या फोनला ४,९०० रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६ इंच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर, रियरला ८ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

Oppo A11K

oppo-a11k

ओप्पोच्या या फोनची किंमत ९,८९० रुपये आहे. एअरटेल कॅशबॅक ऑफरनंतर याची किंमत ३,८९० रुपये होते. या फोनमध्ये ६.२२ इंच डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो पी३५ प्रोसेसर, २ जीबी रॅम आणि १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा मिळतो.

Moto E7 Plus

या फोनची किंमत ८,९९९ रुपये आहे, मात्र एअरटेल ऑफर अंतर्गत फोनला २,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर, ६.५ इंच डिस्प्ले आणि ४८ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला आहे.

लावा Z6

lava-z6

९,६९९ रुपये किंमतीच्या या फोनला एअरटेल कॅशबॅक ऑफर अंतर्गत ३,६९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ६.५० इंच डिस्प्ले, ६ जीबी रॅमसह मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसर, फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

रेडमी 9 प्राइम

या फोनमध्ये ६.५३ इंच डिस्प्ले दिला असून, याचा आस्पेक्ट रेशियो १९.५:९ आहे. यात ४ जीबी रॅमसह मीडियाटेक हीलियो जी८० चिपसेट मिळतो. यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनची किंमत ९,९९९ रुपये असून, एअरटेल ऑफर अंतर्गत ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M02s

samsung-galaxy-m02s

सॅमसंगच्या या फोनची किंमत १०,४९८ रुपये आहे, मात्र एअरटेल ऑफर अंतर्गत ४,४९८ रुपयात मिळेल. यामध्ये ३ जीबी रॅम, ६.५० इंच डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ४५० चिपसेट दिला आहे.

Lenovo A6 नोट

Lenovo A6 Note स्मार्टफोनची किंमत ९,९९९ रुपये आहे. परंतु, एअरटेल ऑफरसह फोन फक्त ३,९९९ रुपयात मिळेल. यामध्ये ६.०९ इंच डिस्प्ले, ३ जीबी रॅम, मीडियाटेक हीलियो पी२२ चिपसेट, १३ मेगापिक्सल ड्यूल रियर आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here