फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने अनेकजण नवनवीन वस्तूंची खरेदी करत आहेत. या फेस्टिव्ह सीझनच्या निमित्ताने तुम्ही देखील नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. अनेकजण स्मार्टफोनसह एक पर्यायी फोन म्हणून फीचर फोन वापरत असतात. फीचर फोन्स वापरण्यास सोपे आणि टिकाऊ देखील असतात. सध्या बाजारात स्मार्टफोनची मागणी असली तरीही अनेकजण आजही फीचर फोन वापरत आहेत. तुम्ही देखील नवीन फीचर फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच काही चांगल्या पर्यायांची माहिती देत आहोत. कमी किंमतीत तुम्हाला JioPhone, JioPhone 2, Itel Magic 2 4G, Nokia 11 4G, Nokia 110 4G, Micromax X512, Itel IT2163, Samsung Guru 1200 आणि Micromax X816 सारखे फोन्स मिळतील. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जिओफोन

जिओफोन

जिओफोनमध्ये २.४० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. फोन Spreadtrum SC9820A प्रोसेसरसह येतो. यामध्ये फ्रंटला ०.३ मेगापिक्सल आणि रियरला २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच, यात ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेज दिले आहे. पॉवरसाठी २००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन KAI OS वर काम करतो. जिओफोनला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून १,७९९ रुपयात खरेदी करू शकता.

जिओफोन 2

jiophone-2

JioPhone 2 मध्ये २.४० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. फोन Spreadtrum SC9820A प्रोसेसरसह येतो. ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन १८ भाषा सपोर्ट करतो. फोनमध्ये ०.३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि २ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी रॅम स्टोरेज दिले आहे. तर पॉवरसाठी २००० एमएएचची बॅटरी दिली आहे. हा फोन KAI OS वर काम करतो. या फोनची किंमत २,९९९ रुपये आहे.

Itel Magic 2 4G

itel-magic-2-4g

या फोनमध्ये २.४० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. यात रियरला १.३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. तर फोनमध्ये ६४ एमबी रॅम आणि १२८ एमबी स्टोरेज दिले आहे. १९०० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या फोनला २,३९९ रुपयात खरेदी करू शकता.

नोकिया 110 4G

फोनमध्ये १.८० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२०x१६० पिक्सल आहे. फोनमध्ये १२८ एमबी रॅम आणि ४८ एमबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये १०२० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन सीरिज ३०+ वर काम करतो. फोन Unisoc टी७०० प्रोसेसरसह येतो. फोनची किंमत २,७९९ रुपये आहे.

मायक्रोमॅक्स X512

micromax-x512

Micromax च्या या फोनमध्ये १.७७ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. फोनमध्ये ५६ एमबी रॅम आणि २४ एमबी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ०.३ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. १७५० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनची किंमत १,१५४ रुपये आहे.

Itel IT2163

फोनमध्ये १.८ इंच डिस्प्ले दिला असून, फोनमध्ये SC६५३२E प्रोसेसर दिला आहे. पॉवरसाठी १००० एमएएचची बॅटरी दिली आहे. ४ एमबी रॅम आणि ४ एमबी स्टोरेजसह येणाऱ्या या फोनला प्लिपकार्टवरून ८६९ रुपयात खरेदी करू शकता.

सॅमसंग गुरु 1200

samsung-guru-1200

या फोनमध्ये १.५२ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२८x१२८ पिक्सल आहे. फोनमध्ये २०८MHz वन कोर प्रोसेसर दिला आहे. यात ४ एमबी रॅम आणि ८ एमबी स्टोरेज मिळते. स्टोरेजला १६ जीबीपर्यंत वाढवू शकता. ८०० एमएएच बॅटरीसह येणाऱ्या या फोनला १,१७८ रुपयात खरेदी करू शकता.

मायक्रोमॅक्स X816

मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये २.८ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x३२० पिक्सल आहे. हा फोन वनकोर प्रोसेसरसह येतो. यात ३२ एमबी रॅम आणि ३२ एमबी स्टोरेजसह येतो. स्टोरेजला ८ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये रियरला ०.३ मेगापिक्सल रियर कॅमेरा दिला आहे. १७५० एमएएच बॅटरीसह येणारा हा फोन Amazon वर १,६८९ रुपयात उपलब्ध आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here