देशातील आणि जगातील नामांकित तंत्रज्ञान कंपन्या बाजारात एकापेक्षा एक लॅपटॉप ऑफर करत असतात. आजकाल लॅपटॉप गरजेचा झाला आहे. शाळा-कॉलेजचे क्लासेससाठी लॅपटॉप अत्यावश्यक बनला आहे .आणि यामुळेच गेल्या काही दिवसात लॅपटॉप्सची मागणी देखील प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला बाजारात उपलब्ध काही चांगल्या लॅपटॉप्सबद्दल माहिती देत आहोत. तुमचे बजेट जर फार नसेल तर तुमच्या बजेट किमतीत किंमतीत Dell 15 (2021), HP 15 (2021), Acer Aspire 5, ASUS VivoBook 14 (2020) आणि Lenovo IdeaPad Slim 3 (2021) हे भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम पर्याय आहेत.आज आम्ही तुम्हाला या सर्व लॅपटॉपच्या फीचर्स आणि किंमत इत्यादींबद्दल माहिती देत आहोत. जाणून घेऊया या टॉप-५ लॅपटॉप्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर.

Lenovo IdeaPad Slim 3 (2021)

lenovo-ideapad-slim-3-2021

Lenovo IdeaPad Slim 3 (2021) मध्ये १५.६ -इंचाचा फुल HD LED डिस्प्ले आहे. हा बॅकलिट कीबोर्ड असलेला लॅपटॉप आहे. डिस्प्लेला २५०-nits ब्राइटनेस मिळते. हा एक पातळ आणि हलका लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये एचडी वेबकॅम, डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. लॅपटॉप 11 व्या जनरेशनच्या Intel Core i5-1135G7 प्रोसेसरवर काम करतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर या लॅपटॉपमध्ये ८GB DDR4 रॅम आणि २५६ GB SSD स्टोरेज असून ४५ Wh बॅटरी देण्यात आली आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Lenovo IdeaPad Slim 3 (2021) ची किंमत ४९,९९० रुपये आहे.

Asus VivoBook 14 (2020)

asus-vivobook-14-2020

ASUS VivoBook 14 (2020) मध्ये १४.० इंच फुल एचडी एलईडी डिस्प्ले आहे. हा बॅकलिट लॅपटॉप आहे. हा एक पातळ आणि हलका लॅपटॉप आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर हा लॅपटॉप १० व्या जनरेशनच्या Intel Core i5-1035G1 प्रोसेसरवर काम करतो. या लॅपटॉपमध्ये 8GB DDR4 रॅम आणि ५१२ GB SSD स्टोरेज आहे. त्यात इंटेल यूएचडी ग्राफिक्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपमध्ये ३७ Wh बॅटरी देण्यात आली आहे. यासोबतच, याला २.५ इंचाचा SATA स्लॉट मिळतो, ज्यामधून HDD/SSD स्टोरेज अपग्रेड केले जाऊ शकते. ASUS VivoBook 14 (2020) ची किंमत ४७,९०० रुपये आहे.

Acer Aspire 5

acer-aspire-5

Acer Aspire 5 मध्ये १५.६ इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले आहे. हा बॅकलिट कीबोर्डसह हलका लॅपटॉप आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर हा लॅपटॉप ११ व्या जनरेशनच्या Intel Core i5-1135G7 प्रोसेसरवर काम करतो. या लॅपटॉपमध्ये ८ GB DDR4 रॅम आणि 1TB HDD स्टोरेज आहे. यात इंटेल आयरिस Xe ग्राफिक्स कार्ड आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाल्यास, या लॅपटॉपमध्ये ४८ Wh बॅटरी आहे जी एका चार्जवर १० तास चालते. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर Acer Aspire 5 ची किंमत ४४,९९० रुपये आहे.

HP 15 (2021)

hp-15-2021

HP 15 (2021) 220 nits ब्राइटनेससह १५.६ इंचाचा फुल एचडी अँटी-ग्लेअर डिस्प्ले दाखवतो. हा बॅकलिट कीबोर्डसह हलका लॅपटॉप आहे. लॅपटॉप १० व्या जनरेशनच्या इंटेल कोर i3-10110U प्रोसेसरवर काम करतो. या लॅपटॉपमध्ये ८ GB DDR4 RAM (१६ GB पर्यंत वाढवता येणारी) आणि ५१२ GB SSD स्टोरेज आहे. त्यात इंटेलचे इंटिग्रेटेड यूएचडी ग्राफिक्स देण्यात आले आहेत. लॅपटॉपमध्ये ४१ Wh बॅटरी देण्यात आली आहे. याला इंटेल टर्बो बूस्ट तंत्रज्ञानाचा सपोर्ट मिळतो. किमतीबद्दल बोलायचे झाले तर HP 15 (2021) ची किंमत ४१,९९० रुपये आहे.

डेल १५ (२०२१)

dell-15-2021

Dell 15 (2021) मध्ये १५.६ इंचाचा फुल एचडी एलईडी बॅकलिट अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. ज्यामध्ये २२० निट्स ब्राइटनेस आहे. हा बॅकलिट कीबोर्डसह हलका लॅपटॉप आहे. Dell 15 (21) एक Inspiron 3511-सीरीजचा लॅपटॉप आहे, ज्यामध्ये Nero bezels उपलब्ध आहेत. लॅपटॉपला एचडी वेबकॅम आणि लिफ्ट बिजागर डिझाइन मिळते. हा लॅपटॉप११ व्या जनरेशनच्या इंटेल कोर i3-1115G4 प्रोसेसरवर काम करतो. लॅपटॉपमध्ये ८ GB DDR4 रॅम आणि २५६ GB SSD स्टोरेज आहे. Dell 15 (2021) ची किंमत ४१,९९० रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here