नोकिया कम्युनिकेटर

Nokia Communicator हा त्या काळातील सर्वात स्टायलिश फोन असायचा. Nokia Communicator Series हे पोर्टेबल गॅझेट मानले जायचे . सुरुवातीला, हा फोन मागील बाजूने सामान्य दिसत होता, परंतु उघडल्यानंतर, एक पूर्ण QWERTY कीबोर्ड आणि एक स्क्रीन होती. जी, फोन इतकी मोठी होती. त्या काळात हा त्या फोनपैकी एक होता ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होती. या फोनमध्ये ईमेल, एसएमएस आणि इतर कम्युनिकेशन सेवा मिळू शकतात. हा नक्कीच एक मस्त फोन होता.
नोकिया 3310

Nokia 3310 हा कंपनीचा सर्वात मजबूत फोन होता, ज्यामुळे तो बाजारात हिट झाला होता. Nokia 3310 कंपनीचा सर्वात हायटेक फोन नव्हता. त्याची रचना अगदी सोपी होती. यामध्ये युजर्सना ३ एसएमएस मेसेज पाठविण्याची परवानगी होती. दिलेल्या कीपॅडवर टाइप करणे सोपे होते, त्यामुळे तो सर्वांचा लोकप्रिय फोन बनला. आज देखील Nokia 3 310 हा फोन लाँच झाल्यास खऱ्या फोन चाहत्यांना आवडेल यात शंका नाही.
नोकिया E71

जेव्हा Blackberry चे QWERTY कीबोर्ड फोन बाजारात उपलब्ध होते. त्या काळात Nokia E71 हा ब्लॅकबेरी फोनसाठी सर्वोत्तम पर्याय होता. या फोनमध्ये एक चांगला QWERTY कीबोर्ड देण्यात आला होता . या फोनमध्ये वाय-फाय सपोर्ट उपलब्ध होता. कीपॅडवरून ईमेल, संपर्क आणि कॅलेंडर पाहण्यासाठी या फोनमध्ये मायक्रो की देण्यात आली होती. या फोनमध्ये ३.२ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये जीपीएस नेव्हिगेशन देखील देण्यात आले आहे.
नोकिया एन-गेज

Nokia N Gage Series नोकियाच्या यशस्वी Series पैकी एक आहे. मात्र, इतर मालिकांप्रमाणे ती यशस्वी नव्हती. या फोनमध्ये एक समर्पित फिजिकल बटण देण्यात आले आहे, जे गेम खेळण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे निन्टेन्डो गेमबॉय अॅडव्हान्स युजर्सना लक्ष्य केले होते. या फोनची एक अडचण अशी होती की फोन कॉलसाठी तो वापरायला थोडा कठीण होता . कॉलिंग दरम्यान स्पीकर फोन वापरण्यासाठी ते ९० डिग्री कोपऱ्यातून धरून ठेवावा लागायचा.
Noka 6600

नोकिया 6600 2003 मध्ये बाजारात लाँच झाला होता. त्यावेळी हा कंपनीचा सर्वात हायटेक फोन होता. हा नोकियाचा हाय-एंड स्मार्टफोन देखील होता, जो व्यावसायिक युजर्सद्वारे वापरला जायचा . या फोनमध्ये इंटिग्रेटेड VGA कॅमेरा, म्युझिक आणि व्हिडिओ प्लेयर देण्यात आला आहे. यामध्ये मेमरी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येऊ शकते. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ आणि इतर फीचर्स देण्यात आले होते. नोकियाचा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी फोन होता. आतापर्यंत जगभरात १५० दशलक्ष युनिट्सची विक्री झाली आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times