हायलाइट्स:

  • Infinix Note 10 Pro स्मार्टफोन आहे बेस्ट
  • कमी किमतीत मिळतात दमदार फीचर्स
  • २५६ जीबी पर्यंत स्टोरेजही उपलब्ध

नवी दिल्ली: प्रत्येकाला कमी किमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असतो आणि जर तुम्ही १७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उत्तम फीचर्स असलेला फोन शोधत असाल तर आमची ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला Infinix ब्रँडच्‍या अशा स्‍मार्टफोनबद्दल सांगणार आहोत जो या किंमतीच्‍या सेग्मेंटमध्‍ये ग्राहकांना २५६ GB स्‍टोरेजसह ८ GB रॅम देखील देतो. सहसा, या किमतीच्या श्रेणीमध्ये, ग्राहकांना बाजारात फक्त १२८ GB स्टोरेज असलेले मोबाईल मिळतात.

वाचा: iPhone XR खरेदी करायचंय तर ‘ही’ ऑफर आहे बेस्ट, मिळतोय मोठा डिस्काउंट, पाहा डिटेल्स

Infinix Note 10 Pro :

डिस्प्ले: या Infinix मोबाईल फोनमध्ये ६. ९५ इंच फुल एचडी प्लस सुपर फ्लुइड डिस्प्ले आहे. जो, १८० Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. मॉडेल ९० Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहे.

प्रोसेसर: MediaTek Helio G95 SoC वेग आणि मल्टीटास्किंगसाठी वापरला गेला आहे.

कॅमेरा: Infinix Note 10 Pro च्या मागील बाजूस ६४ मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी ग्राहकांना फोनच्या पुढील भागात २६ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर मिळेल.

बॅटरी: ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh मजबूत बॅटरी आहे.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये, फेस अनलॉक वैशिष्ट्ये आणि सुरक्षिततेसाठी ग्राहकांना यूएसबी टाइप-सी पोर्ट, ३. ५ मिमी हेडफोन जॅक, फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

Infinix Note 10 Pro ची भारतात किंमत:

Infinix ब्रँडच्या या भक्कम वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या Infinix मोबाईल फोनच्या ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. या किंमतीमध्ये, ग्राहकांना सामान्यतः फ्लिपकार्ट किंवा अॅमेझॉनवर १२८ GB स्टोरेजने पॅक केलेले मोबाइल मिळतात.

infinix 2


या श्रेणीतील इतर पर्याय:

Realme 8s 5G फोन फ्लिपकार्टवर १७,९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. जो, १२८ GB स्टोरेजसह येतो, Motorola G60 सुद्धा त्याच किंमतीत १२८ GB स्टोरेज ऑफर करत आहे.

वाचा: सतत पासवर्ड विसरत असाल तर, पासवर्ड शिवाय ‘असा’ वापरा Computer-Laptop , फॉलो करा या स्टेप्स

वाचा: Motorola चा बजेट स्मार्टफोन Moto E30 लाँच, ४८ MP कॅमेरासह दमदार बॅटरी, पाहा किंमत

वाचा: Laptop- PC मध्ये ‘असे’ लपवा महत्वाचे Folders-Files , वापरा ‘ही’ सोप्पी ट्रिक

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here