गेल्या काही महिन्यात वायर्ड हेडफोनऐवजी वायरलेस इयरबड्स, इयरफोन्सची मागणी प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहक वायरलेस इयरबड्सला पसंती देताना दिसत आहे. कोठेही सहज घेऊन जाण्यास सोपे व दिसण्यास देखील स्टायलिश असल्याने वायरलेस इयरफोन्स, इयरबड्सला ग्राहकांची पसंती मिळत आहे. तुम्ही देखील नवीन वायरलेस हेडफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर चांगले पर्याय उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवर बोट, रेडमी, noise आणि JBL सारख्या ब्रँड्सचे शानदार हेडफोन्स उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या ब्रँड्सच्या हेडफोन्सवर ७० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिले जात आहे. अ‍ॅमेझॉनवर १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत Redmi Earbuds 2C, Noise Buds VS103, boAt Rockerz 450, Infinity(JBL) Glide 510 आणि pTron Tangentbeat हे हेडफोन्स मिळतील. या बेस्ट ब्रँड्सच्या स्वस्त हेडफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Redmi Earbuds 2C

redmi-earbuds-2c

Redmi च्या या शानदार वायरलेस इयरफोन्सची किंमत १,९९० रुपये आहे. मात्र, सेलमध्ये ५५ टक्के डिस्काउंटसह फक्त ८९९ रुपयात खरेदी करू शकता. हे हेडफोन स्प्लॅश आणि स्वेट प्रूफसाठी आयपीएक्स४ रेटिंगसह येतात. यामुळे तुम्ही जॉगिंग आणि वर्कआउट दरम्यान देखील याचा वापर करू शकता. यामध्ये Siri, Alexa, Google वॉयस असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे. तसेच, मल्टी-फंक्शन बटनद्वारे कॉल आणि म्यूझिक स्विच करता येईल. कॉल दरम्यान, म्यूझिकला प्ले/पॉज करू शकता. यामध्ये दमदार बॅटरी दिली आहे.

नॉइज बड्स VS103

noise-buds-vs103

Noise चे लेटेस्ट टेक्नोलॉजीसह येणारे इयरबड्स तुम्ही १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. २,९९९ रुपये किंमत असलेल्या या इयरबड्सला तुम्ही फक्त ९९९ रुपयात खरेदी करू शकता. यामध्ये १४ तास प्लेटाइम मिळतो. तसेच, कॉल कनेक्ट आणि डिसकनेक्टचे फीचर दिले आहे. Noise च्या या इयरबड्सला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही दिवसभर यावर गाणी ऐकू शकता. यामध्ये फुल टच कंट्रोल आणि वॉइस असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे.

Rockerz 450 वर

boat-rockerz-450

boAt Rockerz 450 हा एक स्टायलिश हेडफोन आहे. ३,९९० रुपये किंमत असलेल्या या हेडफोनला तुम्ही तब्बल ७७ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ८९९ रुपयात खरेदी करू शकता. हा हेडफोन एक्वा ब्लू रंगात येतो. या वायरलेस ब्लूटूथ हेडफोनला तुम्ही सहज कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. यामध्ये ४० एमएम डायनॅमिक ड्रायव्हर दिले असून, जे इमर्सिव्ह एचडी ऑडिओ प्रदान करतात. यामध्ये ३०० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी ८ तास प्लेबॅक ऑफर करते. यात वॉयस असिस्टेंटचा सपोर्ट दिला आहे.

इन्फिनिटी (JBL) ग्लाइड 510

infinity-jbl-glide-510

जर तुम्ही कोणाला गिफ्ट देण्यासाठी हेडफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Infinity (JBL) Glide 510 हा चांगला पर्याय ठरेल. ३,९९९ रुपये किंमत असलेल्या या हेडफोनला ६३ टक्के डिस्काउंटनंतर फक्त १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या हेडफोनमध्ये ७२ तास प्लेटाइम मिळतो. तसेच, नॉर्मल आणि डीप बास आउटपूटसाठी ३६ एमएम ड्रायव्हर्ससह ड्यूल इक्वलाइडर मोड दिला आहे. यात क्विड चार्जिंग फीचर दिले आहे. याशिवाय हँडस फ्री कॉलिंग, वॉइस असिस्टेंटची सुविधा मिळते.

पीट्रॉन टॅन्जेंटबीट

ptron-tangentbeat

pTron Tangentbeat या वायरलेस नेकबँडची किंमत २,४९९ रुपये आहे, मात्र सेलमध्ये फक्त ५९९ रुपयात खरेदी करू शकता. हा नेकबँड पाणी आणि घामापासून पूर्णपणे सुरक्षित राहतो. यामध्ये वॉइस असिस्टेंट फीचर दिले आहे. याशिवाय Passive Noise Cancelation टेक्नॉलोजी देखील मिळते. pTron Tangentbeat वायरलेस नेकबँडमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. दमदार बॅटरी लाइफसह येणाऱ्या pTron Tangentbeat नेकबँडमध्ये अनेक कामाचे फीचर्स मिळतात. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा चांगला पर्याय ठरेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here