हिवाळा सुरू झाला असून, भारतातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे देखील वायू प्रदुषणात वाढ झाली आहे. यामुळे तुमच्या रुममधील हवा देखील प्रदुषित आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या हवा प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली असून, यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता उद्भवते. अशा स्थितीमध्ये स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी तुम्ही एअर प्यूरिफायरचा वापर करू शकता. बाजारात एअर प्यूरिफायरची मागणी देखील वाढताना दिसत आहे. बाजारात २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगले एअर प्यूरिफायर्स उपलब्ध आहेत. या बजेटमध्ये तुम्हाला Samsung AX40T3020UW/NA 34-Watt Air Purifier, Eureka Forbes Aeroguard AP 700 Air Purifier, Xiaomi Mi Air Purifier 3, Philips AC1215/20 Air Purifier, Blueair Blue Pure 211 Air Purifier, Honeywell Air Touch HAC35M1101G Air Purifier आणि AmazonBasics Air Purifier मिळतील. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सॅमसंग AX40T3020UW/NA 34-वॉट एअर प्युरिफायर

samsung-ax40t3020uw/na-34-वॅट-एअर-प्युरिफायर

या एअर प्यूरिफायरची किंमत ११,९८० रुपये आहे. सॅमसंगच्या या एअर प्यूरिफायरमध्ये ३ स्टेप फिल्ट्रेशन सिस्टम दिले आहे, जे ९९.९ टक्क्यांपर्यंत अल्ट्रा फाइन पार्टिकल्सला कॅप्चर करते. यात HEPA फिल्टर दिले आहे.

युरेका फोर्ब्स एरोगार्ड एपी 700 एअर प्युरिफायर

या एअर प्यूरिफायरची किंमत ८,४९९ रुपये आहे. यामध्ये फिल्ट्रेशनसाठी ६ स्टेज आहेत. यात H1N1 फिल्टर दिले आहे. हे फिल्टर ९९.९९ टक्के एअरबोर्न वायरसला हटवते.

शाओमी मी एअर प्युरिफायर 3

xiaomi-mi-एअर-प्युरिफायर-3

Xiaomi च्या या एअर प्यूरिफायरची किंमत ९,९९९ रुपये आहे. Xiaomi Mi Air Purifier 3 मध्ये एक ओलेड डिस्प्ले दिला असून, जो रियल टाइम पीएम२.५ कंसंट्रेशन, टेंप्रेचर आणि ह्यूमिडिटी, वाय-फाय कनेक्शन आणि वर्किंग मोड मिळतो. यात ३८० m3/h चे CADR आहे, जे ४८४ वर्गफूट रुममधील हवा स्वच्छ ठेवते. यात Alexa आणि Google Assistant चा सपोर्ट मिळतो.

फिलिप्स AC1215/20 एअर प्युरिफायर

या एअर प्यूरिफायरची किंमत ९,९९९ रुपये असून, यात ४ स्टेज फिल्ट्रेशन मिळते. हे फ्री फिल्टर, एक्टिवेटेड कार्बन फिल्टर आणि डबल लेअर्ड ए१३ ग्रेंड HEPA फिल्टरद्वारे प्रोसेस होते. हे २२६-३३३ वर्गफूट खोलीतील हवा शुध्द ठेवते.

ब्लूएअर ब्लू प्युअर 211 एअर प्युरिफायर

ब्लूएअर-ब्लू-प्युअर-211-एअर-प्युरिफायर

Blueair Blue Pure 211 Air Purifier ची सुरुवाती किंमत १६,५९९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर Blueair Blue Pure 211 Air Purifier मध्ये HEPA सायलेंट टेक्नोलॉजी आणि ५४० वर्गफूटापर्यंतच्या रुमसाठी हाय CADR दिले आहे. या एअर प्यूरिफायरमध्ये वॉशेबल प्री-फिल्टर देखील दिले आहे, जे मोठ्या पार्टिकल्सला पकडते व मुख्य फिल्टरची लाइफ वाढवते. यासोबतच, यात एक कार्बन फिल्टर देखील दिले आहे, जे इतर धोकादायक घटकांना नष्ट करते.

हनीवेल एअर टच HAC35M1101G एअर प्युरिफायर

honeywell-air-touch-hac35m1101g-एअर-प्युरिफायर

किंमतीबद्दल सांगायचे तर Honeywell Air Touch HAC35M1101G Air Purifier ची सुरुवाती किंमत १६,२९९ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर Honeywell Air Purifier मध्ये ४५० वर्गफूट रुममधील हवा साफ करण्याची क्षमता आहे. यात ३०० m3/hr चे CADR दिले आहे आणि फिल्टर जवळपास ३ हजार तास टिकते. याचा वापर दररोज ८ तास केला तरीही हे १ वर्ष सहज टिकते. पेटेंट Honeywell HiSiv टेक्नोलॉजीसह ३ स्टेज एडवांस्ड फिल्ट्रेशन सिस्टम दिली आहे.

AmazonBasics एअर प्युरिफायर

amazonbasics-एअर-प्युरिफायर

किंमतीबद्दल सांगायचे तर AmazonBasics Air Purifier ची सुरुवाती किंमत फक्त ६,५०१ रुपये आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे तर AmazonBasics Air Purifier मध्ये ५ स्टेज फिल्ट्रेशन आणि ३६०m३/hour कॅपेसिटी आहे, जी याला एका मध्यम आकाराच्या रुमसाठी योग्य बनवते. कंपनीचा दावा आहे की, हे सर्व पार्टिकल्सला ९९.९७ टक्क्यांपर्यंत हटविण्यास सक्षम आहे. हे धूळ, बॅक्टेरिया, एलर्जी, किटाणू व इतर घटकांपासून हवा साफ करते. तसेच, घाण वास जावा यासाठी यात एक्टिवेटेड कार्बन फिल्टर दिले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here