स्मार्टफोन खरेदी करतांना सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो बजेटचा. तुम्हाला जर स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. पण, तुमचे बजेट जर थोडे कमी असेल तर, आता काळजी करण्याचे कारण नाही. सध्या प्रत्येक रेंजमध्ये जबरदस्त फीचर्स असलेले फोन्स उपलब्ध आहे. यात अगदी ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत देखील एक उत्कृष्ट फोन तुम्ही घरी आणू शकता. बजेटमध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे. किंवा कोणता खरेदी करावा असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या फोनची वैशिष्ट्ये एकदा पाहा. ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या सर्वच फोनमध्ये चांगले फीचर दिले आहेत. मुख्य म्हणजे किंमत कमी असली तरी काही भन्नाट फीचर्स यात देण्यात आले आहे.जाणून घ्या ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोनविषयी ज्यामध्ये पावरफुल बॅटरीसह इतर फीचर्स देखील मिळत आहे.

Itel A48

itel-a48

ज्यांचे बजेट कमी आहे. आणि ज्यांना कमी किमतीत सर्व फीचर्सने परिपूर्ण असा एक जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. तर तुम्ही Itel A48 खरेदी करू शकता. Itel A48 स्मार्टफोनची किंमत ६,५९७ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.१ -इंचाची HD+ स्क्रीन आहे. फोटोग्राफीसाठी यात ५ MP रियर आणि फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, स्मर्टफोनमध्ये क्वाड कोर प्रोसेसर या स्मार्टफोनमध्ये आहे. आणि ३००० mAh बॅटरी देण्यात या युजर्सना मिळेल.

पुढे jiophone

jiophone-पुढे

JioPhone Next ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. Reliance Jio चा JioPhone Next हा नवीन स्मार्टफोन आहे. या उपकरणाची किंमत ६,४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. या तुम्हाला अनेक फीचर्स मिळतील . स्मार्टफोनमध्ये ५. ४५ इंच टचस्क्रीन HD डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन ७२० x १४४० पिक्सेल आहे. यामध्ये यूजर्सना १३ MP कॅमेरा आणि ८ MP सेल्फी कॅमेरा मिळेल. याशिवाय डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन QM-215 प्रोसेसर आणि ३, ५०० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

नोकिया C01 प्लस

nokia-c01-plus

तुम्हाला जर स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, Nokia C01 Plus तुमच्यासाठी एक मस्त पर्याय ठरू शकतो. Nokia C01 Plus स्मार्टफोनची किंमत ६,१९९ रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये २ GB रॅम आणि १६ GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच, यात ५ MP रियर कॅमेरा आणि २ MP सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. याशिवाय यूजर्सना या स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच स्क्रीन, Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आले आहे तसेच युजर्सना यात ३००० mAh ची बॅटरी मिळेल.

Infinix Smart 5A

infinix-smart-5a

Infinix Smart 5A हा फोन Android 11 (Go Edition) सह येतो. आणि कमी बजेट असणाऱ्यांकरिता एक चांगला पर्याय ठरू शकतो. Infinix Smart 5A मध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक हेलिओ A 20 प्रोसेसर आहे. स्टोरेज बद्दल बोलायचे झाले तर Infinix Smart 5A फोन २ GB रॅम + ३२ GB इंटरनल स्टोरेज सह येतो. फोनची किंमत ६,९९९ रुपये आहे. फोटग्राफीसाठी यात ८ मेगापिक्सेल कॅमेरा देखील देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनची ची बॅटरी ५००० mAh आहे.

लावा Z66

lava-z66

स्वस्तात मस्त स्मार्टफोन म्हणून Lava Z66 देखील अनेकांना आवडतो. Lava Z66 स्मार्टफोनची किंमत ६,९९९ रुपये आहे. या डिव्हाइसमध्ये ३ GB रॅम आणि ३२ GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. याशिवाय यूजर्सना स्मार्टफोनमध्ये १३ MP + ५ MP कॅमेरा सेटअप आणि १३ MP सेल्फी कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहे. आणि इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Lava Z66 ला ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि ३९५० mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here