स्मार्टफोनसह सध्या स्मार्ट टीव्हीची मागणी देखील वाढली आहे. कंपन्या वेगवेगळ्या आकारात व जबरदस्त फीचर्ससह स्मार्ट टीव्ही लाँच करत आहे. स्मार्ट टीव्हीचे अनेक फायदे आहे. केवळ चित्रपट/सीरिज नाही तर इतर अनेक कामांसाठी देखील सध्या टीव्ही उपयोग येतो. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील वेगवेगळ्या व्हेरिएंटमध्ये टीव्ही सादर करत आहेत. Samsung, OnePlus आणि Redmi सारख्या कंपन्यांनी स्मार्टफोनसोबतच स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये स्थान निर्माण केले आहे. तुम्ही देखील घरी नवीन टीव्ही आणण्याचा विचार करत असाल तर बाजारात एका चांगले पर्याय उपलब्ध आहेत. ५५ इंच साइजमध्ये येणारे हे स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स साइट Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हींच्या खरेदीवर तुम्हाला डिस्काउंट आणि बँक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. अशाच ५५ इंच स्क्रीनसह येणाऱ्या सर्वोत्तम स्मार्ट टीव्हींच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

OnePlus 55 इंच U Series 4K LED स्मार्ट Android TV

oneplus-55-inches-u-series-4k-led-smart-android-tv

OnePlus 55 inches U Series 4K LED Smart Android TV ची मूळ किंमत ५९,९९९ रुपये आहे, मात्र डिस्काउंटनंतर Amazon वरून फक्त ५२,८९० रुपयात खरेदी करू शकता. स्मार्ट टीव्हीवर शानदार ऑफर्स आणि डिस्काउंट मिळते. अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांजॅक्शनवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय ३ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर ठराविक कार्ड्सवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळतो. ५५ इंच स्क्रीनसह येणाऱ्या या टीव्हीत अनेक शानदार फीचर्स मिळतात.

सॅमसंग 138 सेमी (55 इंच) क्रिस्टल 4K प्रो सीरीज अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी टीव्ही

samsung-138-cm-55-inches-crystal-4k-pro-series-ultra-hd-smart-led-tv

Samsung 55 inchesCrystal 4K Pro Series Ultra HD Smart LED TV ची किंमत ७६,९०० रुपये असून, डिस्काउंटसह फक्त ५९,९९० रुपयात खरेदी करू शकता. बँक ऑफर अंतर्गत ७.५ टक्के डिस्काउंटसह अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांजॅक्शनवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळते. याशिवाय टीव्ही खरेदीवर ग्राहकांना बिटक्लास फुल कोर्सवर ३० टक्के डिस्काउंट मिळेल. तसेच, ३ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या ऑर्डरवर ठराविक कार्ड्सवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळतो.

Redmi 139 सेमी 55 इंच 4K अल्ट्रा HD Android स्मार्ट एलईडी टीव्ही

redmi-139-cm-55-inches-4k-ultra-hd-android-smart-led-tv

Redmi च्या या ५५ इंच 4K Ultra HD स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत ५४,९९९ रुपये आहे, मात्र अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही फक्त ४५,९९९ रुपयात खरेदी करू शकते. अ‍ॅमेझॉनवरून हा टीव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिटक्लास फुल कोर्सवर ३० टक्के सूट मिळेल. तसेच, ३ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदीवर ठराविक कार्ड्सवर नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील मिळतो. या टीव्हीमध्ये अँड्राइड टीव्ही १०, ३० वॉट्स साउंड आउटपूट, डॉल्बी ऑडिओ सारखे फीचर्स दिले आहेत.

सोनी ब्राव्हिया 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी Google टीव्ही

sony-bravia-55-inches-4k-ultra-hd-smart-led-google-tv

Sony Bravia 55 inches 4K Ultra HD Smart LED Google TV अ‍ॅमेझॉनवर ७५,९९० रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत १,०९,९०० रुपये आहे. तुम्हाला अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रांजॅक्शनवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच, बिटक्लास फुल कोर्सवर ३० टक्के सूट दिली जात आहे. सोनीच्या या शानदार टीव्हीत २० वॉट साउंड आउटपूट, डॉल्बी एटमॉस, वॉइस सर्च सारखे फीचर्स मिळतात. या टीव्हीवर कंपनी ३ वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.

LG 55 इंच 4K अल्ट्रा HD स्मार्ट एलईडी टीव्ही

lg-55-इंच-4k-अल्ट्रा-एचडी-स्मार्ट-लेड-टीव्ही

LG 55 inches 4K Ultra HD Smart LED TV ५२,९९९ रुपयात उपलब्ध असून, यावर बँक ऑफर्स आणि डिस्काउंटचा लाभ मिळतो. टीव्हीची मूळ किंमत ७९,९९० रुपये आहे. टीव्ही खरेदी करताना अ‍ॅमेझॉन पे बॅलेन्सचा वापर केल्यास १ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल. तसेच, काही ठराविक कार्ड्सवर ३ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या खरेदीवर नो-कॉस्ट ईएमआयचा लाभ मिळतो. अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्ड ट्रांजॅक्शनवर १,५०० रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काउंट देखील मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here