नवी दिल्ली : ला प्रीमियम स्मार्टफोन्ससाठी ओळखले जाते. कंपनीच्या फोन्समध्ये शानदार कॅमेरा आणि एडवांस टेक्नोलॉजीसह येणारे फीचर्स मिळतात. कंपनीच्या या शानदार फीचर्ससह येणाऱ्या फोनला स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. हा फोन अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात उपलब्ध आहे.

वाचा:

OnePlus Nord CE 5G ची किंमत
OnePlus Nord CE 5G स्मार्टफोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. या फोनवर तब्बल १६ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. याशिवाय एसबीआय कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट मिळते. या दोन्ही ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोनला १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

OnePlus Nord CE 5G Che तपशील
वनप्लसच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोन सिल्वर, ब्लू आणि ब्लॅक रंगात येतो.

फोनमध्ये इन बिल्ट अ‍ॅलेक्सचा सपोर्ट दिला आहे. अ‍ॅलेक्सच्या माध्यमातून फोनला वॉइस कमांडद्वारे ऑपरेट करता येईल. फोनचे अनेक फीचर्स वॉइस कमांडवर काम करतात.

यात ६.४३ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तर पॉवरसाठी ४५०० एमएएच lithium-ion ची बॅटरी मिळतो. ड्यूल सिमसह येणारा हा फोन ५जी सपोर्ट करतो. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७५०जी ५जी प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे.

वाचा:

वाचा:

वाचा:

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here