देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच योगगुरू रामदेव बाबा यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या फोटोत बाबा रामदेव हॉस्पिटलच्या बिछाण्यावर पडलेले दिसत आहे. त्यांच्या दोन्ही बाजुला डॉक्टरांसोबत अन्य लोक मास्क लावलेले उभे दिसत आहेत.

या फोटोत दावा करण्यात येत आहे की, करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी गोमूत्राचे ओव्हर डोस झाल्याने बाबा रामदेव यांना AIIMS मध्ये दाखल करण्यात आले आहे.

खरं काय आहे?

बाबा रामदेव यांचा हा फोटो २०११ म्हणजेच ९ वर्ष जुना आहे. ज्यावेळी त्यांनी काळ्या पैशांविरोधात उपोषण सुरू केले होते. हा फोटो १२ जून २०११ रोजी काढलेला आहे.

कशी केली पडताळणी?

या फोटोला गुगलवर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
ची एक फोटोगॅलरीची लिंक मिळाली. या गॅलरीचे शीर्षक ‘ ends fast against black money’
होते. गॅलरीत १३ वा फोटो सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोसारखाच आहे. या फोटो गॅलरीच्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांनी देहरादून हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या धर्मगुरूंच्या उपस्थितीत आपले ९ दिवसांचे उपोषण सोडले होते.

तसेच आम्हाला ट्विटर युजर Tijarawala SK
चे एक ट्विट मिळाले. Tijarawala SK ने आपल्या ट्विटर बायोच्या माहितीनुसार, ते बाबा रामदेव यांचे प्रवक्ते आहेत.

तिजारावालाने चुकीच्या दाव्यासह रामदेव यांचा जुना फोटो स्क्रीनशॉट शेअर करताना लिहिलेय, हे चुकीचे आहे. योग गुरु रामदेव बाबा पूर्णपणे तंदूरुस्त आहेत.

निष्कर्ष

बाबा रामदेव यांचा जो फोटो करोना व्हायरसला जोडून शेअर केला जात आहे. तो फोटो २०११ चा आहे. त्यांनी भ्रष्टाचारविरोधात आपले उपोषण सोडले होते, असे ‘मटा फॅक्ट चेक’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here