करोना महामारीमुळे अजूनही वर्क फ्रोम होम सुरू आहे. याशिवाय शाळा, कॉलेज देखील पूर्णपणे सुरू झाले नाहीत. अशा स्थितीत घरुनच काम करताना व ऑनलाइन क्लासेससाठी इंटरनेट आवश्यक झाले आहे. तुम्हाला देखील दररोजच्या कामासाठी, चित्रपट/सीरिज अथवा ऑनलाइन सर्फिंगसाठी जास्त इंटरनेट लागत असल्यास तुम्ही दररोज २ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान निवडू शकता. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स आणत असतात. रिलायन्स जिओ आणि एअरटेलकडे देखील ग्राहकांसाठी असेच काही शानदार प्लान उपलब्ध असून, या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २ जीबी डेटाची सुविधा मिळते. याशिवाय प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा देखील मिळते. तसेच, काही प्लान्समध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जाते. दररोज २ जीबी डेटा ऑफर करणाऱ्या अशाच रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या प्रीपेड प्लान्सविषयी जाणून घेऊया.

​रिलायन्स जिओचा २,५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

३६५ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. याशिवाय १० जीबी अतिरिक्त डेटा देखील दिला जात आहे. म्हणजेच, वर्षभरासाठी एकूण ७४० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Jio अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा ८८८ रुपयांचा प्रीपेड प्लान

८४ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये यात दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच, ५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण १७३ जीबी डेटा ऑफर केला जातो. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि Jio अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

​रिलायन्स जिओचा ६६६ रुपयांचा प्रीपेड प्लान

६६६ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. तसेच, दररोज १०० एसएमएस, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि Jio अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

रिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

८४ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.

​रिलायन्स जिओचा ४४४ रुपयांचा प्रीपेड प्लान

५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये देखील दररोज २ जीबी यानुसार एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

रिलायन्स जिओचा २४९ रुपयांचा प्रीपेड प्लान

या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शनची सुविधा दिली जात आहे.

​एअरटेलचा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

५६ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉल, दररोज १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे एक महिन्याचे मोफत ट्रायल, डिज्नी+ हॉटस्टार मोबाइलचा मोफत अ‍ॅक्सेस, फ्री हेलोट्यून्स आणि Apollo २४|७ सर्कलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

एअरटेलचा ६९८ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या या प्लानची वैधता ८४ दिवस असून, दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉल, दररोज १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे एक महिन्याचे मोफत ट्रायल, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅक, विंक म्यूझिकचा मोफत अ‍ॅक्सेस, फ्री हेलोट्यून्स आणि Apollo २४|७ सर्कलचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मोफत मिळते.

​एअरटेलचा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान

५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉल, दररोज १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे एका महिन्याचे मोफत ट्रायल, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅक, विंक म्यूझिकचा मोफत अ‍ॅक्सेस, फ्री हेलोट्यून्स आणि Apollo २४|७ सर्कलचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

एअरटेलचा २९८ रुपयांचा प्रीपेड प्लान

या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज २ जीबी याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड वॉइस कॉल, दररोज १०० एसएमएस, प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशनचे एका महिन्याचे मोफत ट्रायल, फास्टॅग रिचार्जवर १०० रुपये कॅशबॅक, विंक म्यूझिकचा मोफत अ‍ॅक्सेस, फ्री हेलोट्यून्स आणि Apollo २४|७ सर्कलचे तीन महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here