भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart ने काही दिवसांपूर्वीच फेस्टिव्ह सीझनचे आयोजन केले होते. या फेस्टिव्ह सेलमध्ये स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे पाहायला मिळाले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टकडून अधिकाधिक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहे. फोनच्या खरेदीवर ग्राहकांना डिस्काउंट, बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरचा फायदा तर मिळतोच. मात्र, आता Flipkart ने यापेक्षा शानदार सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. Flipkart ने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एका नवीन प्रोग्रामची घोषणा केली आहे. Flipkart Love it or Return It नावाच्या या प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना प्रीमियम आणि हाय एंड स्मार्टफोन टेस्ट करता येणार आहे. तसेच, फोन न आवडल्यास ठराविक कालावधीनंतर परत देखील करता येईल. फोन परत केल्यानंतर ग्राहकांना पूर्ण रिफंड परत मिळेल. फ्लिपकार्टच्या या खास प्रोग्रामबाबत सविस्तर जाणून घेऊया.

​Flipkart ने Samsung सह केली भागीदारी

फ्लिपकार्ट-सॅमसंग-

या प्रोग्रामसाठी फ्लिपकार्टने Samsung सह भागीदारी केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना नवीन लाँच झालेले Samsung Galaxy Z Flip 3 आणि Samsung Galaxy Z Fold 3 हे फोल्डेबल स्मार्टफोन्स वापरता येतील. या प्रोग्रामचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना स्मार्टफोनला फ्लिपकार्टवरून ऑर्डर करावे लागेल. ग्राहक हा फोन १५ दिवस वापरू शकतील व न आवडल्यास पुन्हा परत करता येईल. ग्राहकांना फोन परत करायचा असल्यास कंपनी डिव्हाइसची क्वालिटी चेक करेल व त्यानंतर पूर्ण रिफंड रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाईल.

​Flipkart Love it or Return It: या प्रोग्रामचा कसा घ्याल फायदा?

फ्लिपकार्ट-प्रेम-ते-किंवा-रिटर्न-इट-

Flipkart च्या Love it or return it प्रोग्राम अंतर्गत रिफंडसाठी ग्राहकांना ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे शेअर केलेल्या रिटर्न रिक्वेस्ट वेब लिंकवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अ‍ॅपमध्ये व्हेरिफिकेशन आणि लॉग इन करण्यासाठी IMEI नंबर द्यावा लागेल. तसेच, बँकेची माहिती व इतर माहिती द्यावी लागेल. यानंतर रिफंडशी संबंधित तिकीट नंबर जनरेट होईल. त्यानंतर अ‍ॅपद्वारे फोन व्यवस्थित काम करत आहे की नाही हे पाहिले जाईल. तसेच, फोन पिकअप करताना देखील अधिकृत कर्मचाऱ्याकडून तपासणी केली जाईल.

​या शहरात मिळेल फ्लिपकार्टच्या प्रोग्रामचा फायदा

फोन तपासल्यानंतर सर्वकाही व्यवस्थित असल्यास पूर्ण रिफंड ७ दिवसात बँक खात्यात जमा होईल. फ्लिपकार्टच्या या प्रोग्रामची सुरुवात बंगळुरु, चेन्नई, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, गुरुग्राम, वडोदरा, पुणे, हैद्राबाद आणि कोलकातासह इतर काही शहरात झाली आहे. फ्लिपकार्टच्या या प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना प्रीमियम स्मार्टफोनचा वापर करता येईल. ज्या ग्राहकांना फोन खराब तर नसेल अशी भिती वाटते अशांसाठी हा प्रोग्राम फायद्याचा ठरेल. ग्राहक १५ दिवसात फोन परत करू शकतील.

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 3 चे तपशील

samsung-galaxy-z-flip-3-

Samsung Galaxy Z Flip 3 मध्ये ६.७० इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२६४० पिक्सल आहे. यात दुसरा एमोलेड डिस्प्ले १.९ इंच आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर Qualcomm SM८३५० Snapdragon ८८८ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित One UI ३.१.१ वर काम करतो. यात रियरला १२ + १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ३३०० एमएएचची बॅटरी दिली आहे.

Samsung Galaxy Z Fold 3 Che तपशील

samsung-galaxy-z-fold-3-

Samsung Galaxy Z Fold 3 मध्ये ७.६० इंच Foldable Dynamic AMOLED डिस्प्ले दिला आहे. तर दुसरा डिस्प्ले ६.२ इंच आहे. फोन ऑक्टा कोर Qualcomm SM८३५० Snapdragon ८८८ प्रोसेसरचा सपोर्टसह येतो. यात रियरला १२+ १२ + १२ मेगापिक्सल आणि फ्रंटला १० + १४ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. यात २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४४०० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड ११ आधारित One UI वर काम करतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here