नवी दिल्ली : Redmi चा नवीन नेक्स्ट जनरेशन स्मार्टफोन Remdi Note 11T 5G भारतात ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. Xiaomi ने दावा केला आहे की, स्मार्टफोन Next Genration racer असेल. Device #NextGenRacer या टॅग-लाइनसह सादर केले गेले आहे. Redmi Note 11T 5G ची मायक्रो वेबसाईट Xiaomi ने लाईव्ह आहे. ज्यानुसार, Redmi Note 11T 5G स्मार्टफोन शक्तिशाली बॅटरी, प्रोसेसर सपोर्टसह ऑफर केला जाईल. तसेच, जलद इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील यात देण्यात येणार आहे.

वाचा:

Redmi Note 11T 5G स्मार्टफोन झूमस्टर प्रोसेसर, सुपर फास्ट चार्जिंग, स्विफ्ट डिस्प्ले, रॅम बूस्टर, शार्प कॅमेरा, लाइटिंग लुकसह येईल. Redmi Note 11T 5G स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केलेल्या Redmi Note 11 5G ची री-ब्रँडेड आवृत्ती असेल. Redmi Note 11 5G या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

Redmi Note 11T 5G स्मार्टफोन मॅट ब्लॅक, स्टारडस्ट व्हाइट आणि एक्वामेरीन ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. Redmi Note 11T 5G स्मार्टफोन Snapdragon 898 SoC सपोर्टसह दिला जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये ५००० mAh ची शक्तिशाली बॅटरी समर्थित केली जाऊ शकते. तसेच, हे डिव्हाइस ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ऑफर केले जाऊ शकते.

Redmi Note 11T 5G स्मार्टफोन तीन स्टोरेज पर्याय ६ GB + ६४ GB तसेच ६ GB + १२८ GB आणि ८ GB + १२८ GB मध्ये ऑफर केला जाऊ शकतो. फोन ६.६ इंच FHD + IPS डिस्प्लेद्वारे समर्थित असू शकतो. हे डिव्हाइस २४० Hz टच सॅम्पलिंग रेट आणि ९० Hz रिफ्रेश रेटसह समर्थित असेल. सेल्फीसाठी यात १६ MP कॅमेरा सेन्सर फ्रंटला दिला जाऊ शकतो. तर मागील बाजूस ५० MP ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. याशिवाय ८ MP अल्ट्रा-वाइड लेन्स उपलब्ध असतील.

संभाव्य किंमत: Redmi Note 11T 5G स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची अपेक्षित किंमत १५,९९९ रुपये इतकी आहे. तर, टॉप व्हेरिएंट २०,००० रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो.

वाचा:

वाचा:

वाचा:

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here