सध्या केवळ भारतातच नाही तर, संपूर्ण जगातच 5G नेटवर्कची क्रेझ पाहायला मिळत आहे. भारतात अद्याप 5G नेटवर्क आलेले नाही, परंतु स्मार्टफोन निर्माते आता भारतीय बाजारपेठेत 5G कनेक्टिव्हिटी असलेले हँडसेट लाँच करत आहेत. यामध्ये मजबूत प्रोसेसरपासून ते उत्तम डिस्प्ले, प्रोसेसर आणि कॅमेरा देण्यात आला आहे. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन उपकरण खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला येथे काही जबरदस्त ५जी स्मार्टफोन्सबद्दल सांगत आहो.जे तुम्ही १८,००० रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकाल. विशेष म्हणजे या फोन्समध्ये मजबूत बॅटरी, दमदार प्रोसेसर आणि फोटोग्राफीसाठी मस्त कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये POCO M3 Pro 5G, realme Narzo 30 5G, OPPO A53s 5G सारख्या भन्नाट स्मार्टफोन्सचा समावेश आहे. पाहा डिटेल्स आणि जाणून घ्या या डिव्हाइसेसबद्दल सविस्तर.

Realme 8s 5G

realme-8s-5g

Reality 8S स्मार्टफोन 5G स्मार्टफोन मधील उत्तम पर्यायांपैकी एक आहे. यात ६४ MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. आणि MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसरने सुसज्ज असल्याने फोनचा परफॉर्मन्स देखील चांगला आहे. डिव्हाइसमध्ये १६ MP सेल्फी कॅमेरा आहे. ६.५ -इंच फुल HD+ डिस्प्ले आणि ३३ W चार्जरसह ५००० mAh बॅटरी आहे. याशिवाय, फोनमध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज मिळेल, ज्याला SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल. Realme 8s ची किंमत: १७,९९९ रुपये आहे.

Oppo A53S 5G

oppo-a53s-5g

OPPO A53s स्मार्टफोन ड्युअल-मोड 5G, अल्ट्रा क्लियर आय केअर डिस्प्ले आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो. यात १३ MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि ८ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, OPPO A53s स्मार्टफोनमध्ये चांगल्या कामगिरीसाठी तुम्हाला OPPO A53s मध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर मिळेल. तसेच, स्मार्टफोनला अधिक पॉवर देण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देखील उपलब्ध असेल. OPPO A53s ची किंमत: १५,९९० रुपये आहे.

Realme Narzo 30 5G

realme-narzo-30-5g

R ealme narzo 30 हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. यात तुम्हाला अनेक फीचर्स मिळतात. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देखील आहे. यात ४ GB रॅम आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे. जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ TB पर्यंत वाढवता येते. याशिवाय, डिव्हाइसला ४८ MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध करून देण्यात आला. MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि ५००० mAh बॅटरी मिळेल. realme narzo 30 किंमत १४,९९९ रुपये आहे.

Poco M3 Pro 5G

poco-m3-pro-5g

नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. Poco M3 Pro स्मार्टफोनमध्ये ४ GB रॅम, ६४ GB स्टोरेज देण्यात आले आहे. त्यासोबतच MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देखील या कंपनीने यात दिला आहे. याशिवाय, Poco M3 Pro स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ४८ MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ८ MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले आणि ५००० mAh बॅटरी मिळेल. या स्मार्टफोनची किंमत किंमत: १४,४९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here