नवी दिल्लीः हॉलिवूडच्या चित्रपटात हमखास दिसणारा भारतात लाँच करण्यात आला आहे. लग्झरी आणि स्मार्ट होम उत्पादने बनवणारी कंपनी Luxaire ने भारतात आपला नवीन फॅन लाँच केला आहे. या फॅनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फॅनला केवळ सिंगल ब्लेड आहे.

एबीएस ब्लेड मध्ये खास डिझाइन करण्यात आलेल्या एअरोफ्वॉइल प्रोफाइल आहे. यामुळे पंखा कमी आरपीएमवर चालू शकतो. आणि ४२०० सीएफएमचे उच्च वायू प्रवाह देतो. सामान्य पंख्यांच्या तुलनेत हा फॅन अर्ध्या वीजेवर जास्त हवा देतो. म्हणजेच, छोट्या खोलीत कमीत कमी आवाजात कुलिंग देण्याचे काम हा फॅन करणार आहे, असे कंपनीचा दावा आहे. फॅनची डिझाइन व्हर्च्युअली हवा आहे. त्यामुळे कोणत्याही गोंगाटाला दूर करण्याचे काम करते. हा फॅन लक्स १०२० कलाचा एक जबरदस्त नमूना आहे. जो ड्युअल माउंटिंग ऑप्शनमध्ये येतो. या फॅनची मोटरची वॉरंटी १५ वर्ष असून याची किंमत ९२ हजार रुपये आहे.

याआधी कंपनीने लक्झेयरने भारतात आयओटी इनबेल्ट लक्स ५१३० स्मार्ट फॅन लाँच केला होता. या फॅनमध्ये ब्रशलेस डीसी मोटर बसवण्यात आली होती. या पंख्यात तीन डॅन आहे. परंतु, लक्झेयरच्या या स्मार्ट फॅनमध्ये ४ डॅन आहेत. या फॅनला रिमोट कंट्रोलवरून कंट्रोल करता येते. या फॅनमध्ये वाय-फायचा सपोर्ट देण्यात आला आहे. याचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात रेग्युलेटर लावण्याची गरज नाही. या पंख्यात अॅमेझॉन अलेक्साचा सपोर्ट आहे. त्यामुळे आवाजावरून हा फॅन चालू बंद करता येवू शकतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

36 COMMENTS

  1. It was very useful information. Thanks for sharing this information.
    I will be happy to visit my website.
    Thank You

  2. Excellent post. I was checking constantly this
    Extremely useful information specially the last part
    care for such info much. I was seeking this particular information for a very long
    time. Thank you

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here