नवी दिल्लीः शाओमीचे नवीन स्मार्टफोन आणि हे दोन स्मार्टफोन आज दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनचे खास वैशिष्ट्ये लाँच होण्याआधीच लिक झाले आहेत. लाँचिंग आधीच US FCC वेबसाइटवर Redmi Note 9 pro चे खास वैशिष्ट्ये लिक झाले आहेत. शाओमीच्या रेडमी नोट ८ सीरिजनंतर रेडमी नोट ९ सीरिज येणार असून या सीरिजकडे शाओमी चाहत्यांचे लक्ष लागले आहे. शाओमीच्या रेडमी नोट ८ सीरिजला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.

रेडमी नोट ९ प्रो या स्मार्टफोनमध्ये ४,९२० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. रेडमी नोट सीरिज स्मार्टफोनमधील आता पर्यंत देण्यात आलेली सर्वात जास्त बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर आधारित MIUI 11 वर असणार आहे. याआधी गीकबेंच लिस्टिंगमध्येही या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर दाखवण्यात आले होते. रेडमी नोट ९ प्रो मध्ये ३० वॅट फास्ट चार्जिंग आणि Wi-Fi 802.11b/g/n सपोर्ट करणार आहे, अशीही माहिती समोर आली आहे. शाओमीचे ग्लोबल उपाध्यक्ष आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन हे आगामी रेडमी नोट सीरिज स्मार्टफोन संबंधी लागोपाठ ट्विट करीत आहेत. मनु यांच्या एका ट्विटमध्ये चार वेळा ९ आहे.

यावरून असा अंदाज बांधला जात आहे की, रेडमी नोट ९ सीरिजच्या स्मार्टफोनची किंमत ९९९९ रुपये असू शकते. ही किंमत रेडमी नोट ९ ची मूळ किंमत असणार आहे. १२ मार्च रोजी ऑनलाइन कार्यक्रमात शाओमी भारतीय बाजारात नोट ९ सीरिजचे स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. कंपनीने याआधीच सांगितले की, नोट ९ लाइनअपमध्ये क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप मिळणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here