नवी दिल्लीः विवोचा नवीन स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लिक झाला आहे. व्ही १९ नुकताच इंडोनेशियात लाँच करण्यात आला होता. परंतु, Vivo V19 मलेशियानंतर खूप बदल करीत लाँच करण्यात येणार असून मलेशियात जो स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. तोच स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात येणार आहे. विवोच्या मलेशियाच्या ट्विटर हँडलवरून एक प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

लिक झालेल्या रिपोर्टनुसार Vivo V19 ला भारतात आयव्ह्यू डिस्प्लेसह लाँच करण्यात येणार आहे. तसेच विवो व्ही १९ मध्ये ड्युअल पंचहोल सेल्फी कॅमेरा असणार आहे. विवो Vivo V19 ला दोन रंगात लाँच करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. पिंक ब्लू आणि ब्लू या दोन रंगात हा स्मार्टफोन असणार आहे. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर असणार आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज असणार आहे. फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी सुपर अॅमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या स्मार्टफोमध्ये रियर पॅनेलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. ज्यात मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा, दुसरा ८ मेगापिक्सलचा तर तिसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा आणि चौथा कॅमेरा २ मेगापिक्सलचा असणार आहे. फोनमध्ये ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे. जी ड्युअल फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here