HP Chromebook N4020

Amazon वर HP Chromebook N4020 ची किंमत २८,७४१ रुपये असून, डिस्काउंटनंतर २६,९९० रुपयात खरेदी करू शकता. लॅपटॉपमध्ये १४ इंच डिस्प्ले दिला असून, डिव्हाइस Chrome OS वर काम करते. लॅपटॉपमध्ये ४ GB LPDDR४-२४०० SD RAM आणि ४GB/६४GB eMMC + २५६GB स्टोरेज मिळते. यामध्ये Intel Celeron Processor N४०२० प्रोसेसरसह Intel UHD Graphics ६०० ग्राफिक्स मिळतात. १ वर्ष ऑन साइट वॉरंटीसह येणाऱ्या या लॅपटॉपमध्ये Google Assistant चा सपोर्ट मिळतो.
Asus पेंटियम क्वाड कोअर लॅपटॉप

Flipkart वर Asus Pentium Quad Core ची किंमत २५,७०९ रुपये आहे, मात्र १४ टक्के डिस्काउंटनंतर २१,९०० रुपयात खरेदी करू शकता. HP Chromebook N4020 लॅपटॉपमध्ये १५.६ इंच HD LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. हा लॅपटॉप Windows 10 Home वर काम करतो. यामध्ये ४ जीबी रॅम आणि १ टीबी एचडीडी स्टोरेज दिले आहे. यात Intel Pentium Quad Core प्रोसेसरसह Intel Integrated UHD ६०५ ग्राफिक्स मिळतात.
लेनोवो आयडियापॅड स्लिम १

ई-कॉमर्स साइट Amazon वर Lenovo IdeaPad Slim 1 लॅपटॉपची किंमत ४१,८९० रुपये आहे, मात्र ३३ टक्के डिस्काउंटनंतर २७,९९० रुपयात खरेदी करू शकता. एचपीच्या या लॅपटॉपमध्ये ११.६ इंच HD LCD डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. हा लॅपटॉप विंडोज १० वर काम करतो. स्टोरेजसाठी यामध्ये ४ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. तसेच, Intel Celeron N४०२० प्रोसेसर दिला आहे. यामध्ये ३२Wh बॅटरी दिली असून, सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी ६ तास टिकते.
अविता पुरा APU ड्युअल कोअर A6 9220E

ई-कॉमर्स साइट Amazon वर Avita Pura APU Dual Core A6 9220E लॅपटॉपची किंमत २५,९९० रुपये असून, १० टक्के डिस्काउंटनंतर २३,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या लॅपटॉपमध्ये ११.६ इंच HD TFT IPS डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. हा लॅपटॉप विंडोज १० होमवर काम करतो. यात APU Dual Core A6 प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी एसएसडी स्टोरेज दिले आहे. यामध्ये AMD Radeon R४ ग्राफिक्स मिळतात.
HP Chromebook 14a Celeron Dual Core

Amazon वर HP Chromebook 14a Celeron Dual Core ची किंमत ३१,५३२ रुपये असून, ११ टक्के डिस्काउंटनंतर २७,९९० रुपयात खरेदी करू शकता. एचपीच्या या लॅपटॉपमध्ये १४ इंच HD TFT IPS डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आहे. हा लॅपटॉप क्रोम ओएसवर काम करतो व यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. यात Intel Celeron Dual Core प्रोसेसरसह Intel Integrated UHD ६०० ग्राफिक्स मिळतात.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times