नवी दिल्लीः सॅमसंगने आपला () चा ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. याआधी सॅमसंग गॅलेक्सीने भारतात एम३० एसचे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. ज्यात ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा समावेश होता. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी, ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप आणि सुपर अमोलेड डिस्प्ले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम३०एस मध्ये ६.४ इंचाचा इनफिनिटी यू सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. याचे रिझॉल्यूशन १०८० X २३४० पिस्कल आहे. सॅमसंगचा लेटेस्ट स्मार्टफोन वन यूआय आणि अँड्रॉयड ९.० पाय ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. कंपनीने या फोनमध्ये ऑक्टाकोर सॅमसंग अॅक्सिनॉस ९६११ चिपसेट दिला आहे. तर युजर्संना या फोनमध्ये Widevine L1 सर्टिफिकेशन मिळणार आहे. या मुळे युजर्स नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचे एचडी व्हिडिओ पाहू शकतील.

सॅमसंग गॅलेक्सी M30s चा कॅमेरा

या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात युजर्संना ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळणार आहे. तर युजर्संना १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे.

सॅमसंग कनेक्टिविटीसाठी कंपनीने या फोनमध्ये ४ जी व्हीओएलईटी, वायफाय, जीपीएस, ब्लूटूथ ५.० आणि यूएसबी पोर्ट यासारखी फीचर्स दिली आहेत. युजर्संना या फोनमध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि १५ वॅट ची फास्ट चार्जिंग फीचर मिळणार आहे.

सॅमसंग ३० एसची किंमत

कंपनीने लेटेस्ट स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये, ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किमत १४ हजार ९९९ रुपये आणि ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये ठेवली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here