दिल्लीच्या दरियागंज मधील काँग्रेस नेते ‘’ यांनी सिंधिया यांचा हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी लिहिलेय, एक काँग्रेसी भाजपत कसे काय जावू शकतो?. पर्सनल ग्रोथ ठीक आहे परंतु, विचारधारेचे काय? आणि जर तुमच्याकडे विचारधारा नसेल तर तुम्ही कधीही जावू शकतात, काहीही फरक पडत नाही?, निराशाजनक आहे. यास्मिन यांनी या ट्विटवेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांना टॅग केले आहे.
सिंधिया याचा हा फोटो अन्य युजर्संनी वेगवेगवळ्या कॅप्शनसह शेअर केला आहे.
खरं काय आहे ?
ज्योतिरादित्य सिंधिया यांचा शेअर होत असलेल्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे. खरं म्हणजे, त्यांनी भगवा कुर्ता घातला नाही किंवा त्यांच्या कपाळावर टिळाही लावलेला नाही. त्यांच्या हातात पांढऱ्या रंगाचे कागदपत्रे दिसत आहे. परंतु, त्यावर लिहिलेले नाही.
कशी केली पडताळणी?
गुगलवर रिवर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला
ची एक बातमी मिळाली. ४ नोव्हेंबर २०१८ रोजीची ही बातमी आहे. या बातमीत फोटोसाठी न्यूज एजन्सी पीटीआयला क्रेडिट दिले आहे.
या ठिकाणी पाहा खरा फोटो
यानंतर आम्हाला
ची आणखी एक फोटोगॅलरी मिळाली. या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक फोटो आहे. या फोटोच्या कॅप्शननुसार, हा फोटो संसद परिसरातील आहे. म्हणजेच ते ज्यावेळी खासदार होते. त्यावेळचा हा फोटो आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सिंधिया यांचा पराभव झाला आहे.
निष्कर्ष
भगवा रंगाचा कुर्ता आणि हातात ऑपरेशन लोटसचा कागद हातात घेतलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांचा फोटो हा खोटा दाव्याने सोशल मीडियावर शेअर केला जात आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times