भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात एकापेक्षा एक भन्नाट स्मार्टफोन्स लाँच होत आहे. भारतात बजेट स्मार्टफोन्सचे मार्केट मोठे आहे. १५ ते २० हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सला भारतात सर्वाधिक मागणी पाहायला मिळते. असे असले तरी प्रीमियम स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. जास्त रॅम, पॉवरफुल प्रोसेसर, शानदार कॅमेरा, डिस्प्ले असे दमदार फीचर्स हवे असल्यास स्मार्टफोन्ससाठी थोडे अधिक पैसे खर्च करावे लागतात. तुमचे बजेट ५० हजार रुपयांपर्यंत असल्यास बाजारात शानदार फीचर्ससह येणारे अनेक चांगले प्रीमियम स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्हाला Apple iPhone 12 Mini, Vivo X60 Pro, Xiaomi Mi 10, OnePlus 9 आणि ASUS ROG Phone 5 सारखे जबरदस्त स्मार्टफोन्स मिळतील. या स्मार्टफोन्सच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Apple iPhone 12 Mini 128GB

Apple-iphone-12-mini-128gb

५० हजारांच्या बजेटमध्ये येणारा या लिस्टमधील Apple iPhone 12 Mini हा पहिला फोन आहे. आयफोन १२ मिनीचे १२८ जीबी व्हेरिएंट तुम्हाला याच प्राइस रेंजमध्ये मिळेल. या फोनची किंमत ४९,९९९ रुपये आहे. Apple iPhone 12 Mini मध्ये ५.४ इंच शानदार स्क्रीन दिली आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला १२ मेगापिक्सल+१२ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. सोबत ड्यूल एलईडी फ्लॅश दिला आहे. तर फ्रंटला १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.

मी X60 प्रो राहतो

vivo-x60-pro

Vivo X60 Pro स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ४५,१०० रुपये आहे. या किंमतीमध्ये १२ जीबी रॅम व्हेरिएंट मिळेल. विवोच्या या फोनमध्ये ६.५ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२० हर्ट्ज आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये रियरला ४८+ १३+ १३ मेगापिक्सल आणि रियरला सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी Vivo X60 Pro मध्ये ४२०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Xiaomi Mi 10 256GB

xiaomi-mi-10-256gb

५० हजार रुपयांच्या रेंजमध्ये येणारा शाओमीचा Mi 10 हा देखील चांगला फोन आहे. या फोनची किंमत ४९,९९९ रुपये आहे. या किंमतीत फोनचे ८ जीबी रॅम व्हेरिएंट येते. फोनमध्ये ६.६७ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसरचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा १०८ मेगापिक्सल आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात पॉवरसाठी क्विक चार्जिंग सपोर्टसह ४७८० एमएएचची बॅटरी मिळते.

OnePlus 9 256GB

oneplus-9-256gb

OnePlus 9 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ४९,९९९ रुपये आहे. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये ६.५५ इंच स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरसर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळतो. फोटोग्राफीसाठी यात ४८ + ५० + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात व्रॅप चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

ASUS ROG फोन 5

asus-rog-phone-5

गेम खेळण्याच्या आवड असल्यास ASUS ROG Phone 5 स्मार्टफोन चांगला पर्याय आहे. या फोनला गेमर्सला आकर्षित करण्यासाठी डिझाइन केले आहे. या फोनची किंमत ४९,९९९ रुपये आहे. आसुसच्या या फोनमध्ये ६.७८ इंच स्क्रीन दिली असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे. यात Snapdragon ८८८ (५nm), प्रोसेसर मिळतो. फोटोग्राफीसाठी यात रियरला ६४ + १३ + ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर फ्रंटला २४ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here