नवी दिल्लीः गुगलच्या बेंगळुरू येथील एका कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येताच गुगलने सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. काल ट्विटरनेही आपल्या जगभरातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी ट्विटरने खास सुविधाही दिली आहे.

जगभरातील १०० हून अधिक देशात करोना व्हायरस पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ट्विटरने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. काम करण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही, असे आदेश ट्विटरने आपल्या सर्वच्या सर्व म्हणजे जवळपास ५ हजार कर्मचाऱ्यांना दिले आहेत. जगातील अर्थव्यवस्थेला करोना व्हायरसमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट Twitter ने जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. करोना व्हायरसच्या भीतीने सुरक्षेचा उपाय म्हणून अॅपल, मायक्रोसॉफ्ट, आणि फेसबुक या सारख्या कंपन्यांनी आपले मोठे-मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत. अॅपलने ३१ मार्च रोजी होणारा मोठा कार्यक्रम नुकताच रद्द केला आहे. या कार्यक्रमात सर्वात स्वस्तातील आयफोन (iPhone SE) लाँच करण्यात येणार होता. तर अॅपलने आपल्या सर्व कमर्चाऱ्यांना घरातून काम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, कॅनडाचे
याच्या पत्नी सोफी यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कॅनडाच्या प्रमारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान ट्रूडो यांची पत्नीला करोनाची लागण झाली की नाही याबाबच चाचणी घेण्यात आली होती. तपासणीअंती त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here