Xiaomi Mi स्मार्ट बँड 6

Xiaomi Mi Smart Band 6 मध्ये १.५६ इंच एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात स्लीप ट्रॅकिंग, SPO२ मॉनिटर, स्टेप काउंटर, एक्सेलेरोमीटर सेंसर, जायरोस्कोप सेंसर आणि हार्ट रेट मॉनिटर सारखे फीचर्स मिळतात. बँड अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसशी कनेक्ट होतो. यात १२५ एमएएचची बॅटरी दिली असून, २ तासात फूल चार्ज केल्यावर १४ दिवस टिकते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.० दिले असून, अनेक स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. या बँडची किंमत ३,४९९ रुपये आहे.
वनप्लस बँड

वनप्लसच्या या बँडमध्ये १.५६ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १२६x१९४ पिक्सल आहे. यात दिलेली १०० एमएएचची बॅटरी १४ दिवस टिकते. यामध्ये एक्सेलेरोमीटर सेंसर, जायरोस्कोप सेंसर, ऑप्टिकल हार्ट रेट सेंसरसह अनेक वर्कआउट मोड्स मिळतात. यात स्लीप ट्रॅकिंग SPO2 मॉनिटर आणि स्टेप काउंटर दिले आहे. ब्लूटूथ वी.५.० सह येणाऱ्या या बँडची किंमत १,४९९ रुपये आहे.
रेडमी वॉच
Redmi Watch मध्ये १.४ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३२०x३२० पिक्सल आहे. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १० दिवस टिकते. बँड अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसला सपोर्ट करते. यात अनेक महत्त्वाचे सेंसर्स आणि ११ वर्कआउट मोड्स मिळतात. या फिटनेस बँडची किंमत ३,९९९ रुपये आहे.
Realme Watch 2 Pro

Realme Watch 2 Pro मध्ये ४४ एमएम डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३२०x३८५ पिक्सल आहे. यात १०० एमएएचची बॅटरी दिली असून, सिंगल चार्जमध्ये १४ दिवस टिकते. यात हार्ट रेट मॉनिटर आणि थ्री एक्सिस अॅक्सेलेरोमीटर सेंसर दिले आहे. तसेच, ९० स्पोर्ट्स मोड मिळतात. याशिवाय ब्लूटूथ ५.०, जीपीएस, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर आणि स्लिप डिटेक्शन मिळते. Realme Watch 2 Pro ची किंमत ४,५९९ रुपये आहे.
Realme Watch S Pro

Realme Watch S Pro मध्ये ३३ एमएम डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ४५४x४५४ पिक्सल आहे. यात ४२० एमएएचची बॅटरी दिली असून, सिंगल चार्जमध्ये १४ दिवस टिकते. ही वॉच अँड्राइड आणि आयओएस सपोर्ट करते. यात SpO2 मॉनिटर, स्टेप काउंट आणि हार्ट रेट मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.० आणि जीपीएस दिले आहे. वॉच ARM Cortex M4 प्रोसेसरसह येते. रियलमी वॉचला तुम्ही ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.
Xiaomi Mi Watch Revolve Active

Xiaomi Mi Watch Revolve Active मध्ये ३३ एमएम एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ४५४x४५४ पिक्सल आहे. यात ४२० एमएएचची बॅटरी दिली आहे, जी सिंगल चार्जमध्ये १४ दिवस टिकते. वॉच अँड्राइड आणि आयओएस डिव्हाइसला सपोर्ट करते. वॉचमध्ये हार्ट रेट सेंसर, एक्सीलेरेशन सेंसर, जायरोस्कोप सेंसर, जियो मॅग्नेटिक सेंसर, बायोमेट्रिक सेंसर आणि अँबिएंट लाइट सेंसर दिले आहे. याशिवाय अनेक हेल्थ फीचर्स आणि स्पोर्ट्स मोड देखील मिळतात. या वॉचची किंमत ९,९९९ रुपये आहे.
Amazfit GTS 3
Amazfit GTS 3 मध्ये ४४ एमएम एमोलेड डिस्प्ले दिले असून, याचे रिझॉल्यूशन ४५४x४५४ पिक्सल आहे. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी २१ दिवस टिकते. वॉचमध्ये अनेक महत्त्वाचे सेंसर्स, हेल्थ फीचर्स आणि १५० स्पोर्ट्स मोड मिळतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.१, मेसेजिंग सपोर्ट, जीपीएस सपोर्ट दिला आहे. या वॉचची किंमत १३,९९० रुपये आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times